चक्क मोटारसायकलवरून चोरून नेले १.६० लाखांचे लाकूड; दोन आरोपींना अटक

By योगेश पांडे | Updated: December 1, 2023 13:35 IST2023-12-01T13:35:19+5:302023-12-01T13:35:28+5:30

पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Wood worth 1.60 lakhs was stolen from a motorcycle in nagpur | चक्क मोटारसायकलवरून चोरून नेले १.६० लाखांचे लाकूड; दोन आरोपींना अटक

चक्क मोटारसायकलवरून चोरून नेले १.६० लाखांचे लाकूड; दोन आरोपींना अटक

नागपूर : एका आरामशीन कंपनीतील १.६० लाखांचे लाकूड व इतर साहित्य चक्क मोटारसायकलवरून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

मनिलाल भाऊजी पटेल (६४, महादेवनगर) यांची मुरलीधर मंदिराजवळ के.पी.टिंबर मार्ट नावाची आरामशीन कंपनी आहे. कंपनीसाठी लागणारे सागवानी लाकूड व इतर साहित्य तेथील गोदामात ठेवण्यात येते. १५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या गोदामातील लाकूड व लाकडाच्या २५ फ्रेम गायब होत्या. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सूरज राजेश वर्मा (२६, पुनापूर) व रविंद्र दिलीप शर्मा (२०, भोलेश्वर सोसायटी, पुनापूर रोड) यांनी मोटारसायकलवर त्या २५ सागवानी फ्रेम व लाकडाचे १२ नग नेल्याची बाब समोर आली. पटेल यांनी पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे त्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीत वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Wood worth 1.60 lakhs was stolen from a motorcycle in nagpur