शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

महिलांनी न्यायाच्या संघर्षासाठी पुढे यावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 7:41 PM

संविधनाने दिलेले अधिकार प्राप्त करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय कुटुंबाचे रक्षण करता येणार नाही. आमच्या अधिकारासाठी आम्हीच अशी भावना ठेवून सरकारविरुद्ध रस्त्यावर संघर्ष केल्याशिवाय आवाज बुलंद होणार नाही. तेव्हा आम्ही महिलांनी समाजात संविधानाविषयी जागृती केली पाहिजे, न्यायासाठी रस्त्यावर संघर्ष करून न्याय मिळवून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आदिमच्या नेत्या अ‍ॅड. नंदा पराते यांनी येथे केले.

ठळक मुद्देआदिम महिला मेळावा : नंदा पराते यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संविधनाने दिलेले अधिकार प्राप्त करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय कुटुंबाचे रक्षण करता येणार नाही. आमच्या अधिकारासाठी आम्हीच अशी भावना ठेवून सरकारविरुद्ध रस्त्यावर संघर्ष केल्याशिवाय आवाज बुलंद होणार नाही. तेव्हा आम्ही महिलांनी समाजात संविधानाविषयी जागृती केली पाहिजे, न्यायासाठी रस्त्यावर संघर्ष करून न्याय मिळवून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आदिमच्या नेत्या अ‍ॅड. नंदा पराते यांनी येथे केले.राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे शनिवारी महाल येथील खोत सभागृहात महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कमगार नेते विश्वनाथ आसई होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय धापोडकर, ओमप्रकाश पाठराबे, गजानन खोत, मनोहर घोराडकर, धनराज पखाले, शकुंतला वठ्ठिघरे, मंजू पराते, प्रमिला वाडीघरे आदी उपस्थित होते.अ‍ॅड. पराते म्हणाल्या, लोकशाहीमध्ये महिलांच्या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांना धडकी बसेल. हलबा समाजाशी राजकारण करून निवडून येणाऱ्या आमदार, खासदारांचे राजकारण बंद करण्याची वेळ आली आहे. निवडणुकीमध्ये प्रत्येक महिलेने अन्यायाचा जाब विचारलाच पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.विश्वनाथ आसई अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी महिलांनी संघटित होऊन एकता दाखविली पाहिजे. महिलांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष केला तरच न्याय मिळेत. आदिम समाजाला संविधानाने दिलेले अधिकार भाजपा सरकार काढून घेत आहे. या अन्यायग्रस्त आदिमांनी आपली शक्ती दाखवावी आणि जाब विचारावा, असे आवाहन त्यांनी केले.गीता जळगावकर यांनी प्रास्ताविक केले. संचालन अनिता हेडाऊ यांनी केले. मंदा शेंडे यांनी आभार मानले. लोकेश वट्टीघरे, सचिन बोरीकर, राधेश्याम बारापात्रे, निर्मला वरुडकर, रुपाली मोहाडीकर, वेणू पौनीकर, कल्पना मोहपेकर, चंद्रकला बारापात्रे, नलिनी भानुसे, कल्पना वट्टीघरे, सविता बुरडे, चंद्रकला इंजेवार, वैशाली चापरे, मीना पाठराबे, मनोज मौंदेकर, संध्या बोकडे, उर्मिला खानोलकर, शेवंता चिमूरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Womenमहिलाnagpurनागपूर