लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव कारने धडक मारल्याने दुचाकीवरील महिलेचा करुण अंत झाला. तर, तिची मुलगी गंभीर जखमी झाली. लकडगंज पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी हा भीषण अपघात घडला.शुक्रवारी सायंकाळी कळमन्यातील भरतनगरात राहणाऱ्या वंदना एकनाथ दडूरे (वय ४४) या त्यांच्या मुलीसोबत दुचाकीवर बसून जात होत्या. लकडगंज पोलीस ठाण्याच्या समोर भरधाव कार (एमएच ३६/ एच ३८७३) चा आरोपी चालक रोशन प्रभूजी लिल्हारे (वय २४, रा. देव्हाडी, तुमसर) याने दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे वंदना आणि अश्विनी या मायलेकी गंभीर जखमी झाल्या. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.या अपघातामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. बाजूलाच असलेल्या लकडगंज पोलिसांनी आरोपी कारचालक रोशन लिल्हारे याला अटक केली.
नागपुरात कारच्या धडकेत महिला ठार, मुलगी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:18 IST
भरधाव कारने धडक मारल्याने दुचाकीवरील महिलेचा करुण अंत झाला. तर, तिची मुलगी गंभीर जखमी झाली. लकडगंज पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी हा भीषण अपघात घडला.
नागपुरात कारच्या धडकेत महिला ठार, मुलगी गंभीर
ठळक मुद्देपोलीस ठाण्यासमोर भीषण अपघात : लकडगंजमध्ये गुन्हा दाखल