शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

नागपुरात महिलांनी झाडांना बांधल्या इको फ्रेंडली राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:43 PM

रक्षाबंधनाचे औचित्य साधून १०० पेक्षा जास्त महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेत महामेट्रोने लावलेल्या आणि आता फळाफुलांनी बहरलेल्या झाडांना राखी बांधून उत्सव साजरा केला.

ठळक मुद्दे‘महामेट्रो’ आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ यांचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगणा मार्गावरील ‘लिटिल वूड’ येथे ‘महामेट्रो’ आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी रक्षाबंधनाचा अभिनव कार्यक्रम पार पडला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून १०० पेक्षा जास्त महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेत महामेट्रोने लावलेल्या आणि आता फळाफुलांनी बहरलेल्या झाडांना राखी बांधून उत्सव साजरा केला.भ्रूणहत्या, हुंडाबळी अशा कृतीविरुद्ध लढा देऊन मुलगी वाचवली पाहिजे या विचाराएवढेच ‘वृक्ष लावा वृक्ष जगवा’ हेदेखील महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने निसर्ग आणि संस्कृतीला रेशमी धाग्यांनी जोडणाऱ्या वृक्ष-रक्षाबंधन उत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी महाराष्ट्र लघुउद्योग व हातमाग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, ‘बेटी बचाव बेटी पढाव’च्या सदस्या व महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.महामेट्रो पर्यावरण संगोपन व संवर्धनाचे कार्य करीत आहे. नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी वेगवेगळे उपक्रम घेत आहेत. रक्षाबंधन सण महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. नागपूर मेट्रो आणि महिलांमध्ये आपुलकीचे बंध निर्माण होऊन त्यांच्यासोबत अभिनव आणि पर्यावरण पूरक असा उपक्रम घेण्याचा मानस महामेट्रोने पूर्ण केला. लिटिल वूडच्या निसर्ग सौंदर्यपूर्ण वातावरणात पावसाची रिमझिम चालू असताना झाडांना सीडबॉलपासून बनविलेल्या इको फे्रंडली राख्या बांधण्यात आल्या. विविध प्रकारच्या फळाफुलांच्या बियाणांपासून बनविलेल्या सिडबॉलपासून तयार केलेल्या राख्या पावसाने भिजतील आणि त्यातल्या बिया जमिनीवर पडून पुन्हा रुजतील, अशी संकल्पना होती. गेल्या दोन वर्षी दिवसरात्र कार्य करणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राखी बांधून त्यांच्याशी भावबंधकीचे जिव्हाळ्याचे नाते जोडले होते.

टॅग्स :Rakhiराखीnagpurनागपूर