शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

महिला उद्योजिकांना कमी पैशात जागा ; नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 11:40 IST

महिला उद्योजिकांसाठी कमी पैशात जागा उपलब्ध करण्याचा मानस केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केला.

ठळक मुद्देनागपुरात महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला बचत गट व महिला उद्योजिका यांच्यासाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे. नागपूर शहरात विविध प्रकल्प राबविले जाणार आहेत. यात महिला उद्योजिकांसाठी कमी पैशात जागा उपलब्ध करण्याचा मानस केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केला.महापालिके चा समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण समिती तसेच दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका केंद्राच्यावतीने रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री अंतर्भूत महिला उद्योजिका मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या, विशेष उपस्थिात खा. रुपा गांगुली, आ. सुधाकर देशमुख, भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधारकर कोहळे, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, आयुक्त अश्विन मुदगल, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.महिला बचतगटाच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. त्यांना प्रोत्साहन मिळावे. महिला सक्षम व्हाव्यात यासाठी महापालिकेतर्फे दरवर्षी महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन केले जाते. व्यवसाय वा उद्योगात यशस्वी होण्यासाठी महिला उद्योजिकांनी गुणवत्तेशी तडजोड करू नये. उत्तम दर्जा व मार्केटिंग झाल्यास यश मिळेल. शहरात उत्तम दर्जाची उद्याने, क्रीडा मैदान, स्मशानभूमी व चांगले बाजार उभारणार असल्याचे गडकरी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून हागणदारी मुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहे. शौचालयामुळे महिलांना सुविधा उपलब्ध होत आहे. यामुळे महिलांना आजार होण्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती खा. रुपा गांगुली यांनी दिली. महिला बचतगट व उद्योजिकांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी. यासाठी महापालिकेने दरवर्षी महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन केले जात असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली.प्रस्ताविक वर्षा ठाकरे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी उद्योजिका व महिला बचत गटातील महिलांचा गौरव करण्यात आला.यावेळी सभापती भगवान मेंढे, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, नगरसेवक सतीश होले,उषा पॅलट, डॉ. रंजना लाडे, झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

कर्तृत्ववान महिला व खेळाडूंचा गौरवउद्योजिका मेळाव्यात कर्तृत्ववान महिलांचा व शहरातील खेळाडूंचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा वाघमारे, महिला क्रिकेट संघातील खेळाडू मोना मेश्राम, कृषी कीटकतज्ज्ञ संगिता सव्वालाखे, बँकिग क्षेत्रातील नीलिमा बावणे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे, स्कूल व्हॅन चालक तनुजा अरबाज खान, अनसूया बचत गटाच्या रेखा कामडे, लता धकाते, तारा बावणे, पाककला विशारद अपर्णा कोलारकर, वैद्यकीय साहित्य तयार करणाऱ्या शिल्पा गणवीर, मुलांना घडवणारी आई चंद्रकला चिकाणे, मूकबधिर शाळेच्या आदर्श शिक्षिका मीनल सांगोळे यांचा समावेश होता. सत्कारमूर्ती खेळाडूंमध्ये बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, रौनक साधवानी, मृदुल डेहनकर, बॅडमिंटनपटू ऋतिका ठक्कर, खो-खो पटू राहुल सहारे, कराटेपटू साक्षी साहू, रेजू कुशवाह, देशज वैष्णव, दिलीप कावरे, सायकलपटू रजनी राऊत, रामायण स्पर्धेत अव्वल येणार अरबाज पप्पू कुरेशी, हॉकीपटू तौफिक अहमद, शहनाज खान, अ‍ॅथ्लिट अहफाज खान, बॅडमिंटनपटू सौरभ ईन्हानकर आणि आगीतून एकाचे प्राण वाचविणारा अविनाश शेंडे यांचा समावेश होता.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकास