शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

दारूची तस्करी करताना महिलेस नागपूर रेल्वेस्थानकावर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 12:27 AM

मादक पदार्थांची तस्करीविरुद्ध सुरू असलेल्या अभियानांतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमने सोमवारी विदर्भ एक्स्प्रेसच्या लेडीज कोचमध्ये एका महिलेस दारूची तस्करी करताना रंगेहात अटक केली. तिच्या जवळून दारूच्या ९४ बॉटल्स जप्त करण्यात आल्या.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : लेडीज कोचमधून करीत होती प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मादक पदार्थांची तस्करीविरुद्ध सुरू असलेल्या अभियानांतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमने सोमवारी विदर्भ एक्स्प्रेसच्या लेडीज कोचमध्ये एका महिलेस दारूची तस्करी करताना रंगेहात अटक केली. तिच्या जवळून दारूच्या ९४ बॉटल्स जप्त करण्यात आल्या.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, महिला आरक्षक उषा तिग्गा, अर्जुन सामंतराय, विकास शर्मा, अर्जुन पातोडे आणि सुषमा ढोमणे यांनी ही कारवाई पार पाडली. सोमवारी सायंकाळी ५.२५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाची चमू राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत गस्त घालत होती. दरम्यान प्लॅटफार्म क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या १२१०५ विदर्भ एक्स्प्रेसमध्ये मागील लेडीज कोचमध्ये एक महिला बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत आढळली. चौकशीत तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. तिला आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांच्यासमोर हजर केले. त्यांनी दोन पंचांसमक्ष महिलेची चौकशी केली असता तिने आपले नाव रमा श्रीराम सहारे (६५) रा. बालाजी वॉर्ड, बल्लारशा सांगितले. तिच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या २,६२० रुपये किमतीच्या ९४ बॉटल्स आढळल्या. निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांनी जप्त केलेली दारू आणि महिलेस राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केले.

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरliquor banदारूबंदी