शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नागपुरात  गिफ्टच्या बहाण्याने महिला अधिकाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 21:11 IST

एका महिला अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मैत्रीद्वारे आपल्या जाळ्यात ओढले आणि साडे तीन लाखांचा चुना लावला. सक्करदरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपवर झाली ओळख : सायबर गुन्हेगारांचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका महिला अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मैत्रीद्वारे आपल्या जाळ्यात ओढले आणि साडे तीन लाखांचा चुना लावला. सक्करदरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रानुसार सोमवारी क्वॉर्टर येथील प्रीती या शासकीय विभागात कार्यरत आहेत. त्यांची व्हॉट्सअ‍ॅपवरील एका वैवाहिक ग्रुपवर ब्रिटनमधील आरोपी रॉजर विलियम्स याच्याशी ओळख झाली. विलियम्सने स्वत:ला तो अनिवासी भारतीय असल्याचे सांगितले. यानंतर विलियम्स तिच्याशी संपर्क साधू लागला. दोघांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर बोलणे होत होते. यादरम्यान विलिनाईन विलियम्स नावाच्या एका महिलेने प्रीतीशी संपर्क साधला.ती विलियम्सची बहीण असल्याचे तिने सांगितले. तसेच तिने प्रीतीसाठी एक गिफ्ट पार्सल पाठवले असल्याचेही सांगत प्रीतीबाबतची विस्तृत माहिती विचारली. प्रीतीनेही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सविस्तर माहिती दिली. संपूर्ण माहिती विचारून घेतल्यावर विलिनाईनने प्रीतीला सांगितले की, तिने तारा एक्स्प्रेस सर्व्हिस कुरियरद्वारे गिफ्ट पार्सल पाठवले आहे. याच्या दोनचार दिवसानंतर प्रीतीला राजीव कुमार नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वत:ची ओळख कस्टम आॅफिसर म्हणून दिली. प्रीतीला एक बँक अकाऊंटचा नंबर देऊन त्यात २६ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. यानंतर प्रीतीला ई-मेल पाठवून पैसे जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतर कुरियरमध्ये ८ लाख ६० हजार रुपये येतात. त्याचे खाते अपडेट नसल्याने ही रक्कम ट्रान्सफर होत नाही आहे. त्याने खाते अपडेट करण्याच्या बहाण्याने पैसे जमा करण्यास सांगितले. यानंतर हे प्रकरण मिनिस्ट्री आॅफ फायनान्समध्ये जाईल. तिथून क्लियरन्स घेण्यासाठी ७९ हजार रुपये जमा करावे लागेल. प्रीतीने राजीव कुमारने सांगितल्यानुसार ‘इंटरनेट बँकिंग’च्या माध्यमातून ३ लाख ५६ हजार रुपये जमा केले. यानंतरही राजीवद्वारे पैसे मागितले जात असल्यामुळे तिला संशय आला. प्रीतीने विलियम्स व राजीव कुमारला आपले पैसे परत करण्यास सांगितले. यानंतर त्यांनी संपर्क बंद केला.त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे प्रीतीच्या लक्षात आले. त्यांनी सायबर सेलमध्ये तक्रार केली. प्राथमिक चौकशीनंतर हे प्रकरण सक्करदरा पोलिसांकडे सोपवण्यात आले. सक्करदरा पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी हे दिल्लीचे असल्याचे सांगितले जाते. त्यांचे मोबाईल व बँक खात्यावरून याची माहिती मिळते. पीएसआय डी.के. धडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.आठवड्याभरातील दुसरी घटनाएका आठवड्यातील या प्रकारची ही दुसरी घटना आहे. सीताबर्डी येथील ममता कालबेडे नावाच्या शिक्षिकेला ख्रिसमस उपचाराच्या नावावर १.१४ लाखाने फसवण्यात आले होते. या प्रकरणातही कस्टम आॅफिसर म्हणून फसवण्यात आले होते. शिक्षित महिलाच याला बळी पडत आहेत.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपCrimeगुन्हा