कन्हान नदीत महिलेचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:09 IST2021-01-02T04:09:10+5:302021-01-02T04:09:10+5:30
कामठी : शहरालगतच्या कन्हान नदीवरील महादेव घाट परिसरात गुरुवारी (दि. ३१) सायंकाळी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. चाैकशीअंती ...

कन्हान नदीत महिलेचा मृतदेह आढळला
कामठी : शहरालगतच्या कन्हान नदीवरील महादेव घाट परिसरात गुरुवारी (दि. ३१) सायंकाळी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. चाैकशीअंती हा मृतदेह सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा असल्याचे स्पष्ट झाले.
पुष्पा पुसाराम गभणे (६७, रा. येरखेडा, ता. कामठी) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या साेमवारी (दि. २८) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कुणालाही न सांगता घरून निघून गेल्या हाेत्या. घरी परत न असल्याने तसेच शाेध घेऊनही न गवसल्याने त्या बेपत्ता असल्याची पाेलिसात तक्रार नाेंदविल्याची तसेच वर्षभरापासून त्यांचे मानसिक संतुलन ढळले हाेते, अशी माहिती त्यांचा मुलगा विलास गभणे यांनी पाेलिसांना दिली. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी त्यांचा कन्हान नदीच्या महादेव घाट येथे मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. ओळख पटताच पाेलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.