नागपुरात कारमध्ये दिला बाळाला जन्म; चालकाचे प्रसंगावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 10:55 IST2018-01-18T10:55:18+5:302018-01-18T10:55:48+5:30
आपल्या भाच्यासह रुग्णालयात कारने जात असलेल्या महिलेने रस्त्यात कारमध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली.

नागपुरात कारमध्ये दिला बाळाला जन्म; चालकाचे प्रसंगावधान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या भाच्यासह रुग्णालयात कारने जात असलेल्या महिलेने रस्त्यात कारमध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली. दरम्यान कार चालकाने या महिलेला धीर देऊन तिला सुरक्षित रुग्णालयात पोहोचविल्याबद्दल या कार चालकाला पुरस्कार देण्यात आला आहे.
कांचन मेश्राम या आपल्या भाच्यासह कारने रुग्णालयात जात होत्या. दरम्यान रस्त्यातच त्यांना प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यांना प्रसुती वेदना होत असल्याचे लक्षात येताच कारचा चालक शहजाद खान याने काळजी घेऊन कार शक्य तेवढ्या वेगाने रुग्णालयात नेण्याचे ठरविले. त्यांनी या महिलेला धीर देत लक्ष केंद्रित करून कार चालविली.
परंतु प्रसुतीवेदना वाढून रस्त्यातच या महिलेने कारमध्ये बाळाला जन्म दिला. शहजाद खान यांच्यामुळे वेळेत सुरक्षितरीत्या रुग्णालयात पोहोचणे शक्य झाल्याचे मत या महिलेच्या नातेवाईकांनी व्यक्त केले आहे. त्यांनी या कार चालकाला पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला.