शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याने खळबळ, नॅशनल गार्डचे दोन जवान जखमी, संशयित अटकेत  
3
आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२५: व्यापार, धनलाभ आणि आरोग्य! आज तुमच्या राशीत काय आहे?
4
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
5
राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक
6
ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज उद्धवसेनेसाठी मैदानात; निवडणुकीसाठी मतदार यादीचीही पडताळणी
7
Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग
8
‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद जवानाच्या आईची हायकोर्टात याचिका; "अग्निवीर योजना भेदभावपूर्ण अन्..."
9
‘फ्रायडे फिअर’ने इच्छुकांना ‘फिव्हर’; सर्वोच्च न्यायालयाच्या सुणावणीकडे सर्वांचे लक्ष
10
९१ बिबटे पिंजऱ्यात, पण ते सोडायचे कोठे?; वनविभागापुढे पेच, सर्व रेस्क्यू सेंटरसह टीटीसी फुल
11
राणी बागेतील ‘शक्ती’चा संशयास्पद मृत्यू; काहीतरी लपवण्याचा प्रयत्न, प्राणीप्रेमींचा गंभीर आरोप
12
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
13
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
14
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
15
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
16
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
17
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
18
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
19
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
20
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या ट्रेडिंग फसवणुकीत वर्ध्यातील महिला डॉक्टरला अटक, ११ आरोपी फरार

By योगेश पांडे | Updated: July 15, 2024 21:53 IST

शेअर ट्रेडिंग, क्रिप्टो प्रशिक्षणाच्या बहाण्याने अनेकांना गंडा

नागपूर: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली होत असलेल्या व वर्षाच्या सुरुवातीला उघडकीस आलेल्या कोट्यवधींच्या फसवणूकीच्या रॅकेटमध्ये पोलिसांना मोठे यश हाती लागले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी अद्यापही फरार असले तरी वर्ध्यातील एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून डॉक्टर असलेला तिचा पतीदेखील आरोपी आहे. नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

डॉ.प्रिती निलेश राऊत असे अटक करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. विराज सुहास पाटील (दहीसर, मुंबई) हा या रॅकेटचा सूत्रधार आहे. कोलकाता ईडीने पाटील याच्यावर पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ईडीने अटक केल्यापासून पाटील कोलकाता तुरुंगात आहेत. वर्धा येथील सूरज सावरकर याच्या मदतीने त्याने नाइन ॲकॅडमी प्रा. लि. नावाची कंपनी सुरू केली होती. प्रीती आणि तिचा पती डॉ.निलेश यांच्यासोबत सुरेंद्र मधुकरराव सावरकर (सेलू, वर्धा), प्रियंका खन्ना (जालंधर, पंजाब), पी.आर.ट्रेडर्सचा प्रिंन्सकुमार, एम आर ट्रेडर्सचा राकेश कुमार सिंग, टी.एम ट्रेडर्सचा अमन ठाकुर, आर. के. ट्रेडर्सचा राहुल कुमार अकेला व ठाण्यातील मिलन एन्टरप्रायझेस तसेच कोलकात्यातील ग्रीनव्हॅली ॲग्रो यांचे प्रोप्रायटर या प्रकरणात आरोपी आहेत.

या कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केट, क्रिप्टो करंसी याबाबत प्रशिक्षण देण्याची बतावणी करण्यात यायची. नागरिकांना जाळ्यात ओढून ५ ते १५ टक्के नफ्याचे आमिष दाखवत ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सांगितले जायचे. डॉ.प्रिती व तिचा पती डॉ.निलेश यांनी वर्ध्यातील मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित केले होते व त्यानंतर त्यांच्या बोलण्याला फसून लोकांनी गुंतवणूक केली होती. सावरकरच्या सांगण्यावरून नागपुरातील व्यापारी विक्रम बजाज यांच्यासह अनेकांनी टी.पी. वेबसाइटवर ग्लोबल, एफएक्समध्ये गुंतवणूक केली. आरोपींनी गुंतवणुकदारांना त्यांच्या डमी फर्मच्या बँक खात्यात पैसे टाकण्यास सांगितले.

सुरुवातीचा नफा मिळाल्यानंतर पीडितांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. नंतर, गुंतवणूकदारांनी संकेतस्थळावरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश मिळाले नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या गुंतवणूकदारांची १.२१ कोटींची फसवणूक झाली होती. तपासात हा आकडा २.५९ कोटींवर गेला. बजाज यांच्या तक्रारीवरून आर्थिक शाखेने फसवणूक आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. डॉ प्रीती वर्ध्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथून तिला ताब्यात घेतले. तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिच्या चौकशीतून अनेक नवीन लिंक्स समोर येऊ शकतात.

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी