शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुलींसमोर महिलेवर काळाचा घाला, धावत्या ट्रेनमध्ये चढणे जिवावर; दोन्ही मुलींची प्रकृती बिघडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 14:06 IST

डोळ्यादेखत आई रेल्वेगाडीखाली चिरडली गेल्याने पांडे यांच्या दोन्ही मुलींवर जोरदार मानसिक आघात झाला. त्या आक्रोश करू लागल्या.   

नागपूर : बंगळुरू येथून पतीचा निरोप घेऊन दोन मुलींसह बिहारकडे निघालेल्या एका महिलेवर काळाने झडप घातली. येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर मंगळवारी सकाळी  १०:१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. 

गायत्री स्वामी विवेकानंद पांडे (४५) असे मृत महिलेचे नाव असून, त्या बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी होत्या.  गायत्री यांचे पती बंगळुरू येथे स्टेट बँकेत नोकरी करतात. त्यांना दोन मुली आहेत. या मुलींसह गायत्री त्यांच्या पतीकडे काही दिवसांपासून मुक्कामी होत्या. गावाला परत जाण्यासाठी त्या ट्रेन क्रमांक ०६५०९ बंगळुरू दानापूर हमसफर एक्स्प्रेसमध्ये बसल्या. गायत्री यांच्या दोन मुलीही सोबत होत्या. नागपूर स्थानकावर मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास ही गाडी आली. मुलींना नाश्ता खरेदी करण्यासाठी गायत्री फलाट क्रमांक एकवर उतरल्या.

 सकाळी १०:१५ च्या सुमारास ही गाडी पुढे जायला निघाली. त्यामुळे घाईगडबडीत गायत्री यांनी गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दाराची कडी (हॅण्डल) पकडली असतानाच रेल्वेगाडीने वेग धरल्यामुळे रेल्वेचा डबा आणि फलाटाच्या फटीत पांडे यांचे दोन्ही पाय आल्याने त्या चिरडत गेल्या. या थरारक अपघाताने अनेकांच्या अंगावर शहारे आले. 

डोळ्यादेखत आई रेल्वेगाडीखाली चिरडली गेल्याने पांडे यांच्या दोन्ही मुलींवर जोरदार मानसिक आघात झाला. त्या आक्रोश करू लागल्या.   प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वेगाडी थांबवली. त्यानंतर पांडे यांचा मृतदेह काढून तो मेयोत पाठविण्यात आला. या घटनेची सूचना पांडे यांच्या पतीला देण्यात आली. ते  विमानाने दुपारी नागपुरात पोहोचले. त्यानंतर सायंकाळी पत्नीचा मृतदेह ताब्यात घेऊन पांडे ॲम्ब्युलन्सने नालंदाकडे रवाना झाले.

विलंबाने केला घात अनेक प्रवासी गाडी सुटल्यानंतर धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करतात. यात काही क्षणांचा जरी विलंब झाला तर तो जीवघेणा ठरतो. गायत्री पांडे यांच्या बाबतीतही असेच झाले. गाडी सुटली अन् ती पकडण्यासाठी त्या धावू लागल्या. मात्र, त्यांचे वजन काहीसे जास्त असल्याने त्यांचा श्वास भरून आला. अशातही त्यांनी गाडीच्या दाराची कडी पकडली अन् त्यांचा घात झाला. 

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे