सैनिक पती कर्तव्यावर जाताच पत्नीने गळफास घेऊन संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 15:26 IST2021-12-31T14:57:54+5:302021-12-31T15:26:40+5:30
पूनमने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. राजकुमार दोन दिवसांपूर्वी झारखंडला ड्युटीवर निघून गेले. तेव्हापासून ती तणावात होती.

सैनिक पती कर्तव्यावर जाताच पत्नीने गळफास घेऊन संपविले जीवन
नागपूर : सैनिक पती झारखंडला ड्युटीवर जाताच पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सीआरपीएप कॅम्प येथे शिवणगाव येथे घडली. पूनम राजकुमार डगवार (३१) असे विवाहित महिलेचे नाव आहे.
पूनमचे पती राजकुमार डगवार हे सीआरपीएफमध्ये झारखंडमध्ये कर्तव्यावर आहेत. त्यामुळे पूनम ही मुलांबरोबर सीआरपीएफ क्वारर्टरमध्ये राहत होती. दरम्यान, गेल्या आठवड्यात राजकुमार सुट्टीवर नागपुरात घरी आले होते. त्यांनी पत्नी आणि मुलांसह सासुरवाडीत मुक्काम केला. राजकुमार दोन दिवसांपूर्वी झारखंडला ड्युटीवर निघून गेले. तेव्हापासून पूनम तणावात होती.
बुधवारी ती दोन्ही मुलांना घेऊन क्वारर्टवर परत आली. परंतु, माहेरच्यांना तिच्या वागण्यावर शंका आल्याने घरचे तिच्यामागेच घरी पोहोचले. परंतु, पूनमने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तिने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवलेली पोलिसांना मिळाली. यात तिने, आत्महत्येसाठी मी स्वत: जबाबदार आहे, असे लिहिले आहे. तसेच, माझ्या मृत्यूनंतर दोन्ही मुलांचा सांभाळ माझी आई करेल असेही नमूद केले आहे.