महिलेने पोलीस अधिकाऱ्यालाच फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 21:53 IST2020-10-28T21:51:02+5:302020-10-28T21:53:12+5:30
Woman cheated police officer, crime newsभंडारा येथील पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने बनावट फेसबुक आणि ओएलएक्स अकाऊंट तयार करून एका महिलेने त्यांची फसवणूक केली.

महिलेने पोलीस अधिकाऱ्यालाच फसविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा येथील पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने बनावट फेसबुक आणि ओएलएक्स अकाऊंट तयार करून एका महिलेने त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी अमरावती येथील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नूतन नारायण ब्राह्मणे रा. वरुड, जि. अमरावती असे आरोपी महिलेचे नाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुबोध भंडारा पोलिसात कार्यरत आहेत. आरोपी नूतनने सुबोधच्या नावाने बनावट फेसबुक आणि ओएलएक्स अकाऊंट तयार केले. त्यावर सुबोधचा फोटोही लावला. फेसबुकवरून वैवाहिक साईटवर नोंदणी केली. बनावट फेसबुक आणि ओएलएक्स अकाऊंटवरून सुबोधबाबत दिशाभूल करणारे आपत्तीजनक मॅसेज केले. सामानाची खरेदी करून नागरिकांना खोटी आश्वासने दिली. नागरिकांनी सुबोधशी संपर्क साधला असता त्यांना धक्का बसला. त्यांनी कपिलनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.