दारू तस्करीत महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:09 IST2021-05-13T04:09:34+5:302021-05-13T04:09:34+5:30

रुग्णालयात महिलेची पर्स चाेरी नागपूर : खासगी रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याची राेख रक्कम असलेली पर्स चाेरीला गेली. मुशरत जहां या ...

Woman arrested for smuggling liquor | दारू तस्करीत महिलेला अटक

दारू तस्करीत महिलेला अटक

रुग्णालयात महिलेची पर्स चाेरी

नागपूर : खासगी रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याची राेख रक्कम असलेली पर्स चाेरीला गेली. मुशरत जहां या गाेळीबार चाैकातील डाेर्लीकर रुग्णालयात कार्यरत आहेत. १० मे राेजी सेवेत असताना अज्ञात आराेपींनी डाॅक्टरांच्या केबिनमध्ये ठेवलेली त्यांची पर्स चाेरून नेली. मिळालेल्या माहितीनुसार पर्समध्ये २९ हजार रुपये राेख व कागदपत्रे हाेती. तहसील पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नाेकरीचे आमिष दाखवून फसवणूक

नागपूर : नाेकरी आणि लॅपटाॅप देण्याचे आमिष दाखवून एका विद्यार्थिनीची १७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समाेर आली आहे. बबिता चिमणकर यांना श्याम गाैतम नामक व्यक्तीने फाेन करून नाेकरी व लॅपटाॅप देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी १७ हजार रुपये ऑनलाईन जमा करण्यास सांगितले. मात्र, यानंतर पुन्हा त्याने पैशाची मागणी केली. त्यामुळे बबिता यांच्या तक्रारीवरून सक्करदरा पाेलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Woman arrested for smuggling liquor