शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

...और वो आईना साफ करता रहा; ईव्हीएमवर खापर फोडणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 06:46 IST

मी आधुनिक अभिमन्यू आहे. माझ्यासाठीही चक्रव्यूह रचण्यात आला. पण, तो भेदून मी उभा आहे. 'आंधीयो में भी जो जलता हुआ मिल जायेगा, उस दिये से पुछना, मेरा पता मिल जायेंगा... असा शेर म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत सहन केलेल्या वेदनेला वाट मोकळी करून दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर खापर फोडणे सुरू केले आहे. आम्ही लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात हरताच आत्मपरीक्षण केले. फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिले. आता तुम्हीही खुल्या मनाने जनादेश स्वीकारा. मतदारांचा अपमान करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत विरोधकांना फटकारले. 'गालिब ताउम्र ये भूल करता रहा, धुल चेहरे पर थी और वो आईना साफ करता रहा...' असे सांगत त्यांनी विरोधकांना आधी स्वतःच्या चुकांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला गुरुवारी विधानसभेत उत्तर देताना फडणवीस यांनी राज्यातील अभूतपूर्व यशाचे श्रेय पक्षाचे नेते, सहकारी व जनतेला दिले. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत मला व माझ्या कुटुंबीयांना सतत टार्गेट करण्यात आले. पण, मी त्यांचे आभार मानतो. कारण, त्यांनी वातावरण खराब केले व त्यामुळे माझ्‌याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. मी आधुनिक अभिमन्यू आहे. माझ्यासाठीही चक्रव्यूह रचण्यात आला. पण, तो भेदून मी उभा आहे. 'आंधीयो में भी जो जलता हुआ मिल जायेगा, उस दिये से पुछना, मेरा पता मिल जायेंगा... असा शेर म्हणत त्यांनी पाच वर्षांत सहन केलेल्या वेदनेला वाट मोकळी करून दिली.

गुजरातचे मार्केटिंग थांबवावे

फडणवीस म्हणाले, विरोधकच गुजरातचे मार्केटिंग करीत आहेत. त्यांनी ते थांबवावे. जुलै २०२२ पासून महाराष्ट्रात २२० प्रकल्प आले आहेत. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र 'नंबर वन' आहे. महाराष्ट्रात मुंबई व पुणे हीच औद्योगिकीकरणाची केंद्रे होती. पण, आता छत्रपती संभाजीनगर, नाशिक, गडचिरोलीसारखे दुर्गम भागही विकासाचे केंद्र बनत आहेत. गडचिरोलीत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

खंडणीखोरांपासून दूर राहण्याचा सल्ला

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्या पक्षासह सर्वच पक्षांच्या लोकांनी खंडणीखोरांपासून दूर राहावे. असे लोक पुढे चालून आपल्याच गळ्याचा फास बनतात, असा धोकाही वर्तविला.

तीन मुख्यमंत्री अन् तीन शिफ्ट...

महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्रिपदाच्या निवडीला होत असलेल्या दिरंगाईबाबतही सोशल मीडियावर बरेच मीम व्हायरल झाले. त्यातील एका मीममध्ये मित्रपक्षांच्या नेत्यांना प्रत्येकी आठ तास मुख्यमंत्री बनवावे, असे म्हटले होते. त्यामुळे अजित पवार सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत काम करतील, असा निर्णयही आम्ही घेतला होता. कारण ते लवकर उठतात. मी दुपारी चार ते रात्री बारा. आणि नाईट शिफ्ट कोणाला दिली जाणार हे जनतेला माहीत आहे, फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून म्हणताच सभागृहात हशा पिकला.

फडणवीस म्हणाले... 

- राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के अपारंपरिक ऊर्जेचा वापर. 

- राज्यात २५४ मोबाइल फॉरेन्सिक लॅब उभारणार 

- मध्य प्रदेशच्या धर्तीवर प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान वाढविण्याची केंद्राला विनंती. 

- आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत रेकॉर्ड एफडीआय. 

- नदीजोड प्रकल्प आणि जलसंधारणाच्या कामांना गती दिली जाईल. 

- कर्नाटकातून टोयोटाचा प्लॅट महाराष्ट्र आला. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEVM Machineईव्हीएम मशीनvidhan sabhaविधानसभा