Winter Session Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा! सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना २० हजार रुपये आर्थिक मदत देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:39 IST2022-12-27T13:36:04+5:302022-12-27T13:39:18+5:30
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील ३६ गावांवर दावा केला आहे, हा मुद्दा आता हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला आहे.

Winter Session Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा! सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना २० हजार रुपये आर्थिक मदत देणार
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील ३६ गावांवर दावा केला आहे, हा मुद्दा आता हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला आहे. गेल्या दोन दिवसापासून अधिवेशनात विरोधी पक्षातील सदस्यांनी कर्नाटक विरोधातील ठराव आणण्याची मागणी केली होती, आज अधिवेशनात सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे. कर्नाटक सीमेवर असणाऱ्या ८६५ गावांना महाराष्ट्रात आणण्याचा निधार आज विधानसभेत करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना २० हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
आज अधिवेशनात सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे. ज्यांनी सीमाप्रश्नी बलिदान दिले त्यांना हुतात्म म्हणून घोषित केले आहे. सध्या १३ लाभार्थी लाभ घेत आहेत. बेळगाव, कारवार, बिदर येथील मराठी लोकांना सर्व सोयी सुविधा मिळणार आहे. या नागरिकांना फक्त १५ वर्ष महाराष्ट्रात राहत असल्याचा दाखला द्यायचा आहे. तसेच शिक्षमासाठीही त्यांना सोयी-सुविधा देण्यात आलेल्या आहेत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव विधानसभेत एकमताने संमत
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमेवरील नागरिकांचे आभार मानले. बलिदान देणाऱ्या नागरिकांना हुतात्म म्हणून घोषित करण्यात आले, त्यांच्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीला दरमहा १० हजार रुपये निवृत्ती वेतन तसेच वार्षीक प्रवास भत्ता ५०० रुपये आणि ५ हजार रुपये तत्कालीक होती ती आपण आता २० हजार रुपये करण्यात आली आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.