शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

विदर्भातील मंत्र्याने अपमान केल्याने मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा: वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 21:28 IST

Winter Session Maharashtra 2023: हे मंत्री कॅबिनेटमध्ये का मागण्या करत नाहीत, का बोलत नाहीत, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली.

Winter Session Maharashtra 2023: ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता  मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठा, ओबीसी समाजातील युवकांच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा गावगाड्यातील माणूस गुण्या-गोविंदाने रहावा, अशी ठाम भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली. त्याचबरोबर विदर्भातील एका मंत्र्याने राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा अपमान केला म्हणून त्यांनी राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट वडेट्टीवार यांनी केला.

विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावासंदर्भात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिले. या स्वराज्यात सर्व जाती धर्माची माणसे गुण्या-गोविंदाने राहत होती. पण महाराष्ट्रात परिस्थिती बदलत आहे. एकमेकांचे साथीदार वैरी होत आहेत, असे सांगत सरकारने समाजात सलोखा निर्माण केला पाहिजे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर  लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही? राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षाचा विदर्भातील मंत्र्याने अपमान केला. या अध्यक्षांना, सदस्यांना राजीनामा द्यायची वेळ आणली, हे कोणामुळे झाले, अशा पद्धतीने का वागणूक दिली जाते. हे योग्य नाही, असे खडेबोल विजय वडेट्टीवाार यांनी राज्य सरकारला सुनावले.

हे मंत्री कॅबिनेटमध्ये का मागण्या करत नाहीत, का बोलत नाहीत

पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाजातील अनेक जातींना हक्काचे घर नाही. वाशीम मधील पाड्यावर मुलींना अंघोळीला पाणी मिळत नाही. गरिबीमुळे मुलींचे शोषण केले जाते. हे गंभीर असून, आपण या समाजाच्या समस्यांचा विचार करणार आहोत की नाही. समाजात मतभेद निर्माण करून राज्याला अधोगतीकडे न्यायचे आहे का? या राज्यातील तरुण नोकरीसाठी फिरतोय. शेतकरी आत्महत्या करतोय. चंद्रपुरात ओबीसी युवकांचे उपोषण सुरु आहे. धनगर, मुस्लिम, लिंगायत, अशा इतर सर्व समाजाच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत. सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकारमधील मंत्रीच मागण्या करत आहेत. हे मंत्री कॅबिनेटमध्ये का मागण्या करत नाहीत, का बोलत नाहीत, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली.

ओबीसी आमचा डीएनए असे म्हणणाऱ्याना ओबीसींसाठी वेळ मिळत नाही

मराठा समाजाला आरक्षण देऊ, ओबीसी हक्काचं संरक्षण करू अशी भूमिका असली पाहिजे. ओबीसी आमचा डीएनए असे म्हणणाऱ्याना ओबीसींसाठी वेळ मिळत नाही. पदभरती, महागाई ,बाहेर जाणारे उद्योग हे विषय आता बाजूला पडले आहेत. आता तर अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात अबकड वर्गीकरण सरकार आणणार आहे. म्हणजे पुन्हा जातीजातीत भांडणे लावण्याचा डाव आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, ओबीसी समाजात हक्काचे घर नसलेल्या अनेक जाती आहेत. मी मंत्री असताना घरकुल योजना आणली. ७० हजार घरकुले झाली. ओबीसींच्या ७२ वसतिगृहांसाठी पाठपुरावा सुरु आहे. ओबीसींच्या कार्यालयासाठी २८ कोटी मागितले आहेत. ओबीसींसाठी निधी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण हे का मिळत नाही हा खरा प्रश्न आहे. एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीत घेतले जात नाही. सरकारला उपाशी माणसाच्या वेदनांची जाणीव नाही, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेस