शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

हिवाळ्यातील परदेशी पाहुणे लागले परतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 22:22 IST

Foreign birds return , Nagpur newsपक्ष्यांना काेणत्या देशाची सीमा थांबवू शकत नाही, असे म्हणतात. गेली चार-पाच महिने विदर्भातील नद्या, तलाव, पाणथळ जमिनी, शेतशिवार ज्यांच्या किलबिलाटाने फुलला हाेता, ते परदेशी पाहुणे आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. ऊन वाढू लागल्याने त्यांना आता थंड प्रदेशातील त्यांच्या घराची ओढ लागली असून, ते मार्गस्थ झाले आहेत.

ठळक मुद्देऊन वाढल्याने घराची ओढ 

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : पक्ष्यांना काेणत्या देशाची सीमा थांबवू शकत नाही, असे म्हणतात. गेली चार-पाच महिने विदर्भातील नद्या, तलाव, पाणथळ जमिनी, शेतशिवार ज्यांच्या किलबिलाटाने फुलला हाेता, ते परदेशी पाहुणे आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. ऊन वाढू लागल्याने त्यांना आता थंड प्रदेशातील त्यांच्या घराची ओढ लागली असून, ते मार्गस्थ झाले आहेत. हिवाळी पाहुणे जात असले तरी उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे मात्र आगमन सुरू झाले आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर युराेप, अमेरिका, रशिया, मंगाेलिया अशा देशातील वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी हजाराे किलाेमीटरचा प्रवास करीत आपल्या देशात आणि मजल-दरमजल करून विदर्भातही पाेहचत असतात. तलाव, पाणथळ जमिनी, शेतावर या पक्ष्यांची शाळा भरलेली असते. पावसाळा व पुढे हिवाळा असे चार-सहा महिने तरी त्यांचा मुक्काम येथे असताे. पक्षी अभ्यासक यादव तरटे पाटील यांच्यानुसार त्यांच्या मूळ अधिवासाकडे थंडी वाढत असल्याने ते आपल्याकडे माेर्चा वळवतात. यातील काही हिमालयातून व त्या पलीकडच्या देशातून येत असतात. वातावरणात गारवा राहत असल्याने त्यांना आकर्षण असते. यातील बहुतेक पक्षी केवळ उदर भरणाच्या गरजेपाेटी इकडे येतात, पण काही प्रजननाच्या दृष्टीनेही येतात. त्यामुळे अनेक पक्षी पिलांसह परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र त्याबराेबर उन्हाळी पक्ष्यांचेही आगमन हाेत आहे.

 परतीला लागलेले हिवाळी पक्षी

मोठी टिबुकली, राजहंस, काळा ढोक, कांड्या करकोचा, कलहंस, गजरा, परी, सरग बड्डा, सुंदर बटवा, चिमण शेंदऱ्या, शेंदूर बड्डा, ठिपकेदार गरु, निलय, कुलंग, सोन टिटवा, लहान वाळू टिटवा आदी पक्षी हजाराेच्या संख्येने परतीच्या मार्गाला लागले आहेत.

उन्हाळी पाहुणे आले

नदी टिटवी, राखी डोक्याची टिटवी, मोठा आर्ली आदी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. याशिवाय आणखीही काही पक्ष्यांचे, मध्य आशिया, युराेप व हिमालयाच्या भागातून आगमन हाेणार आहे. उन्हाळ्यात येत असले तरी त्यांनाही पाणथळ जमिनीचाच आधार घ्यावा लागताे, हे विशेष.

हिवाळ्यात आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांच्या परतीची सुरुवात झाली आहे. युरोप, मध्य आशिया, युरेशिया, मंगोलिया आदी भागातून येणारे हे विदेशी पक्षी पर्यावरण संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतात. ऊन वाढू लागल्याने ते आता त्यांच्या मायदेशी परत जात आहेत.

 यादव तरटे पाटील, सदस्य - राज्य वन्यजीव मंडळ

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यnagpurनागपूर