लकडगंजमध्ये वाईन शॉप फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST2020-11-22T09:28:24+5:302020-11-22T09:28:24+5:30

नागपूर : कुलरचे डक्टिंग फोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी लकडगंजमधील एका वाईन शॉपमधून रोख तसेच मद्याच्या बाटल्या लंपास केल्या. संजय ...

Wine shop blown up in Lakdaganj | लकडगंजमध्ये वाईन शॉप फोडले

लकडगंजमध्ये वाईन शॉप फोडले

नागपूर : कुलरचे डक्टिंग फोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी लकडगंजमधील एका वाईन शॉपमधून रोख तसेच मद्याच्या बाटल्या लंपास केल्या.

संजय जगन्नाथ चांदेकर (वय ५०) यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, लकडगंजमधील टेलिफोन एक्सचेंज चौकात शक्ती वाईन शॉप आहे. या वाईन शॉपच्या कुलरचे डक्टिंग फोडून चोरटे आत शिरले. आत ठेवलेले विविध प्रकारचे मद्य तसेच २५ हजारांची रोकड असा एकूण १ लाख ३ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, पोलिसांनी चोरट्याचा छडा लावण्यासाठी दुकानाचे सीसीटीव्ही तपासण्याचे प्रयत्न केले असता अनेक महिन्यांपासून ते बंद असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Wine shop blown up in Lakdaganj