वादळी सलामी !

By Admin | Updated: June 9, 2016 02:16 IST2016-06-09T02:16:21+5:302016-06-09T02:16:21+5:30

केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून, बुधवारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने नागपुरात हजेरी लावली. जोराच्या

Windy salute! | वादळी सलामी !

वादळी सलामी !

नागपूर : केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून, बुधवारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने नागपुरात हजेरी लावली. जोराच्या पावसामुळे जरीपटका भागातील वस्त्यांत श्रावस्ती नाल्याचे पाणी शिरले. शहरात ठिकठिकाणी झाडे व होर्डिंग्ज पडल्याने काही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वादळामुळे शहरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पहिल्याच पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली; तसेच थोड्याशा पावसाने महापालिकेच्या नालेसफाईची पोल खोलली आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात शहरातील नाल्याकाठावरील वस्त्यांत पाणी शिरले होते. यात मोठे नुकसान झाले होते. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील नद्या व नाले स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. बहुसंख्य नाल्यांची सफाई झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु पहिल्याच पावसाने जरीपटका भागातील वस्त्यांत नाल्याचे पाणी शिरल्याने महापालिकेच्या स्वच्छता अभियानाची पोल खोलली आहे.

नागरिकांची स्पॅन्को कार्यालयावर धडक
वादळामुळे रात्री महाल, जुनी शुक्रवारी, कर्नलबाग यासह इतर भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या २०० नागरिकांनी महाल भागातील स्पॅन्को कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. परंतु रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. शहराच्या इतर भागातही वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत तो सुरळीत झाला नव्हता.

Web Title: Windy salute!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.