शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
2
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
3
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
4
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
5
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
6
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
7
मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
8
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
9
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
10
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
11
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
12
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
13
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
14
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
15
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
16
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
17
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
18
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
19
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
20
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळणार? दिवाळीतही महसूल यंत्रणा कार्यरत

By योगेश पांडे | Updated: October 17, 2025 18:14 IST

Nagpur : सरकारचा उद्देश प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात मदत वेळेवर पोहोचवणे हा आहे. शेतकऱ्यांना सणासुदीपूर्वी दिलासा मिळावा, यासाठी महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीच्या काळातही काम करतील.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळावा, यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यासाठी महसूल विभाग सुट्टीतही काम करणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शुक्रवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सरकारचा उद्देश प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात मदत वेळेवर पोहोचवणे हा आहे. शेतकऱ्यांना सणासुदीपूर्वी दिलासा मिळावा, यासाठी महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीच्या काळातही काम करतील. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षात असल्याने टीका करतात, हे स्वाभाविक आहे. मात्र, राज्यातील सध्याच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी राजकारण विसरून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. सणासुदीच्या काळात राजकारण न करता शेतकऱ्यांसाठी काम केले पाहिजे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

ओबीसी–मराठा आरक्षणाबाबत भुजबळांना दिली स्पष्टता

२ सप्टेंबरचा आदेश हा केवळ हैदराबाद गॅझेट आणि चार जिल्ह्यांपुरता आहे. राज्य सरकारकडून खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाही. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे.ओबीसींचे हक्क अबाधित राहतील आणि मराठा समाजावरही अन्याय होणार नाही, असे त्यांना सांगण्यात आल्याची बावनकुळे यांनी माहिती दिली.

नागपूरसाठी अधिक एसटी बसेस

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागपूरसाठी अधिक एसटी बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रादेशिक परिवहन विभागातील अनियमिततेवरही चर्चा झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Gift? Farmers may get aid before festival, revenue working.

Web Summary : Maharashtra government strives to provide Diwali aid to farmers before the festival. Revenue department will operate during holidays to deposit funds into eligible farmers' accounts, said Chandrashekhar Bawankule. More ST buses are planned for Nagpur.
टॅग्स :FarmerशेतकरीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर