शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहांची घाेषणा ‘जुमला’ ठरेल काय?

By निशांत वानखेडे | Updated: June 29, 2024 17:28 IST

ओबीसी विद्यार्थी संघटनांचा आराेप : पाच वर्षापासून विद्यार्थी वाऱ्यावर

निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : इतर मागासवर्गीय (ओबीसी) वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात ७२ वसतीगृह सुरू करण्याची घाेषणा करून ५ वर्षे लाेटली तरी एकही वसतीगृह सुरू झाले नाहीत. यावेळीही शैक्षणिक सत्र सुरू हाेऊनही काहीच हालचाली नसल्याने ओबीसी समाजाची अस्वस्थता वाढत आहे. अशात नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात ठळक असे काहीच नसल्याने ही घाेषणा म्हणजे ‘जुमला’ हाेय का, असा आराेप ओबीसी विद्यार्थी संघटनांकडून हाेत आहे.

ओबीसी युवा अधिकार मंचने ७२ वसतीगृह तत्काळ सुरू करावे म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूरचे सहायक संचालक यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. संघटनेचे संयाेजक उमेश काेर्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ साली पहिल्यांदा तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृह उभारण्याचे जाहीर केले हाेते. त्यानंतर पुन्हा २०२१ साली याेजनेचे नाव बदलून वसतीगृह सुरू करण्याबाबत घाेषणा झाली. पण घाेषणेपुढे काहीही झाले नाही. आता पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार बसून दाेन वर्षे झाली, तरी वसतीगृह सुरू झाली नाहीत. या बजेटमध्येही याबाबत काहीच स्पष्ट नाही.

लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेत ओबीसी विभागाद्वारे वसतिगृह सुरू करण्यासंंबंधी वेळापत्रक जाहीर करून आदेश देण्यात आले होते. वेळापत्रकानुसार ५ मार्च २०२४ पासून ओबीसी वसतिगृहे सुरू होणार होते. परंतु ते वेळापत्रक म्हणजे शासनाकडून पुन्हा एकदा गाजर दाखवण्याचा प्रयत्न झाला. आता २०२४-२५ चे शैक्षणिक सत्र सुरू हाेत असताना ओबीसींच्या वसतीगृहाबाबत काही हालचाली नसल्याने ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये असंताेष पसरत असल्याचे काेर्राम म्हणाले. यावेळी कृतल आकरे, पियूष आकरे, विनित गजभिये, आकाश वैद्य, मनीष गिरडकर, पंकज सावरबांधे, खेमराज मेंढे उपस्थित होते. वसतीगृह सुरू करण्यासह सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर कनिष्ठ महाविद्यालय आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहे आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेत सामावून घेण्याची मागणीही संघटनेने केली.

४५ इमारती भाड्याने घेतल्या?ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांसाठी विविध जिल्ह्यात ४५ इमारती भाड्याने घेण्यात आल्याचे ओबीसी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. यातील सर्वाधिक २२ इमारती विदर्भातील जिल्ह्यात आहेत. मात्र शैक्षणिक सत्र सुरू हाेत असताना या वसतीगृहात प्रवेश कधी हाेईल, हा प्रश्न संघटनेने उपस्थित केला.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीStudentविद्यार्थीEducationशिक्षणBudgetअर्थसंकल्प 2024Maharashtraमहाराष्ट्र