बजेट पुस्तकापुरतेच मर्यादित तर राहणार नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:08 IST2020-12-09T04:08:29+5:302020-12-09T04:08:29+5:30
सत्तापक्षाच्या ढिलेपणामुळे कार्यादेश झालेल्या कामांना सुरुवात नाही? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड संक्रमणामुळे मागील नऊ महिन्यात नागपूर शहरात ...

बजेट पुस्तकापुरतेच मर्यादित तर राहणार नाही?
सत्तापक्षाच्या ढिलेपणामुळे कार्यादेश झालेल्या कामांना सुरुवात नाही?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संक्रमणामुळे मागील नऊ महिन्यात नागपूर शहरात कोणत्याही प्रकारची विकास कामे सुरू नाही. स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात वर्ष २०२०-२१ चे २,७३१ कोटीचे प्रस्तावित बजेट सादर केले. १४ वर्षात पहिल्यांदा ४६६.६ कोटीच्या तुटीचे बजेट होते. बजेटला विलंब झाल्याने व मनपा तिजोरीत निधी नसल्याने बजेटमध्ये कार्यादेश झालेल्या आवश्यक कामांना प्राधान्य देण्यात आले. परंतु या कामांनाही खोडा घालण्याचे काम मनपातील काही वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. भाजपाची प्रशासनावरील पकड सैल झाली आहे. सत्तापक्ष सक्रिय न झाल्यास बजेट पुस्तकापुरतेच मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २८ जानेवारीला पदभार स्वीकारताच सर्व प्रकारच्या कामांना ब्रेक लावला. त्यानतंर मार्च महिन्यात कोविड संक्रमण सुरू झाले. मेहनत केल्यानंतर झलके यांनी बजेट दिले. यात कार्यादेश झालेल्या जवळपास २५० जुन्या कामांना मंजुरी देण्यात आली. मनपा सभागृहाच्या मंजुरीनंतर आयुक्तांनीही बजेटला मंजुरी दिली. दरम्यान, विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघातील निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आता आचारसंहिता संपल्यानंतर अधिकारी कार्यादेश झालेल्या कामांची माहिती झोनस्तरावरून संकलित करीत आहेत. वास्तविक याची काहीही गरज नव्हती.