शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

.... मर्दानी बनणार आणि चोख उत्तर देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 10:29 IST

मुस्लीम शाळकरी मुलींनी पाहिला लैंगिक प्रबोधनावरचा चित्रपट महोत्सव

ठळक मुद्देहे पाहिले चित्रपट दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात भेदभाव, कस्तुरी, कॅब राईड, नेमप्लेट, अक्षरा लूप्स हे लैंगिक हिंसाचारावर आधारित तर, मर्दानी-२, पिंक हे लैंगिक हिंसाचाराला आव्हान देणारे चित्रपट दाखवण्यात आले.जाणून घेतला गुड टच आणि बॅड टच

वर्षा बाशू।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: होय, आम्हाला टारगट मुले-माणसे छेडतात.. घाणेरड्या कॉमेंटस करतात.. खूप राग येतो आणि लाजही वाटते. पण आता यापुढे सहन नाही करणार... मर्दानी बनणार आणि त्यांना चोख उत्तर देणार. हा निर्धार आहे, रोज बुरखा घालून शाळेत जाणाऱ्या मुस्लीम मुलींचा. केवळ एकदोन नव्हे तर तब्बल १०० हून अधिक जणींचा. बडा ताजबाग भागात असलेल्या उर्दू शाळेतील आठवी ते दहावी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा. ही हिंमत त्यांना दिली आहे लैंगिक हिंसाचार व भेदभावावर आधारित एका चित्रपट महोत्सवाने.जिथे स्वत:चा चेहराही उघडा ठेवणे दुरापास्त तिथे लैंगिकतेवर आधारित चित्रपट महोत्सव पाहणे व आपल्या जाणीवा समृद्ध करणे ही तर दूरचीच बाब. त्यातून मग हिंसाचाराला बळी पडण्याची मानसिकता रुजत जाते. लैंगिक हिंसाचाराला उत्तर देणे ही चूक नाही, ते योग्य पाऊल आहे याचा आत्मविश्वास मुलींना मिळावा या हेतूने अलीकडेच या महोत्सवाचे आयोजन केल्याचे रुबी वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्ष रुबिना पटेल सांगतात. लहान वयात झालेले लग्न, अकाली लादलेले मातृत्व आणि अचानक दिलेला तलाक या चक्रात अडकलेल्या अनेक मुली या भागात राहतात. त्या घरच्या जाचाला सहन करतानाच, बाहेरचाही छळ सोसत असतात. आर्थिकदृष्ट्या परावलंबी असतात. त्यांना स्वबळाची जाण नसते. अशा मुलींसाठी व शाळकरी मुलींसाठी या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून काही विधायक देता येईल असा विचार त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.देशात अलीकडे झालेल्या प्रियंका रेड्डीसारख्या घटना पाहता, मुलींना सक्षम होण्याची गरज आहे. त्यांना लैंगिक हिंसाचार म्हणजे नेमके काय असते हे जाणवून देण्याची गरज आहे. त्या हिंसाचाराला, अत्याचाराला कसा विरोध करावा हेदेखील समजावण्याची आवश्यकता आहे. आणि मुख्य म्हणजे, असा विरोध केल्याने आपण वाईट ठरत नाही तर, गुन्हेगार वाईट ठरविला जातो, याचा विश्वास निर्माण होण्याची गरज आहे. या सर्व बाबींवर विचार करून या चित्रपट महोत्सवाचे आयोजन सोसायटीतर्फे करण्यात आले होते. या महोत्सवात तीन दिवस चित्रपट दाखवण्यात आले. बडा ताजबाग भागातील उर्दू शाळेतल्या आठवी ते दहावी या वर्गातील मुलींनी हे सर्व चित्रपट पाहिले.या चित्रपटांना पाहिल्यानंतर या मुलींनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या निडर प्रतिक्रिया कौतुकास्पद होत्या. हा महोत्सव संपल्यानंतर मुलींनी विचारले होते असंख्य प्रश्न. काहींनी केला होता व्यक्त खंबीरतेने जगण्याचा निर्धार, तर काहींना उमगले होते जगण्याचे एक नवे सत्य. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके