शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

हे संत साहित्य संमेलनच होणार

By admin | Updated: July 3, 2014 00:48 IST

यंदाचे ८८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत होणार; हेच जवळपास निश्चित करण्यात आले होते. पण ऐनवेळी पंजाबने उचल घेतली. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या बाहेर साहित्य संमेलन झाले नाही.

राजेश पाणूरकर -नागपूरयंदाचे ८८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत होणार; हेच जवळपास निश्चित करण्यात आले होते. पण ऐनवेळी पंजाबने उचल घेतली. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या बाहेर साहित्य संमेलन झाले नाही. संत नामदेवाच्या घुमान या गावी हे संमेलन घ्यावे, असा आग्रह काही महामंडळ सदस्यांनी केला. घुमान येथील आयोजकही पूर्ण तयारीनिशी तयार असल्याने यंदाचे साहित्य संमेलन पंजाबच्या गुरुदासपूर येथीव घुमान या गावी होणार आहे. संत नामदेवांच्या गावात हे संमेलन होत असल्याने हे साहित्य संमेलन संत साहित्यालाच अर्पण केलेले असेल, असा एकत्रित स्वर साहित्यिकांनी आळवला आहे. संत साहित्य संमेलन होण्यास कुणाचाही विरोध नाही. पण यामुळे संमेलनाध्यक्षपदासाठी असणारी गणितेच बदलली आहे. उस्मानाबाद येथे हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असते तर संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या साहित्यिकांनी आता माघार घेतली आहे. संत नामदेवांच्या गावात होणाऱ्या संमेलनासाठी बहुतेक संत साहित्यिकांनी कंबर कसली आहे. यात प्रामुख्याने पुण्याचे अशोक कामत आणि नागपूरचे डॉ. रवींद्र शोभणे इच्छुक आहेत. याशिवाय रामचंद्र देखणे, सदानंद मोरे, यशवंत पाठक यांनीही संमेलनाध्यक्ष होण्यासाठी तयारी दर्शविल्याचे कळले आहे. अद्याप कुणीही अधिकृतपणे समोर आलेले नाही आणि ती प्रक्रिया सुरूही झालेली नाही. अशोक कामत हे पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख आणि राष्ट्रभाषा प्रचार समितीचेही सदस्य आहेत. ते पुण्याचेच असल्याने त्यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून जोर लावण्याची तयारी सुरू केल्याचे कळले. तर डॉ. रवींद्र शोभणे संत नामदेव यांच्यावर नवी कादंबरी लिहित आहेत. त्यांच्या पुस्तकांनी रौप्यमहोत्सवी आकडाही गाठला आहे. डॉ. शोभणेंच्या पाठीशी विदर्भ साहित्य संघही उभा राहू शकतो. याशिवाय सदानंद मोरे यांनीही संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. यशवंत पाठक आणि रामचंद्र देखणेही या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.