विदर्भात इंधन डेपो वाढविण्याची शिफारस करणार!

By Admin | Updated: August 10, 2014 20:55 IST2014-08-10T18:23:48+5:302014-08-10T20:55:41+5:30

विदर्भात तेल कंपन्यांचे इंधन डेपो वाढविण्याची शिफारस,

Will advise to increase fuel depot in Vidarbha! | विदर्भात इंधन डेपो वाढविण्याची शिफारस करणार!

विदर्भात इंधन डेपो वाढविण्याची शिफारस करणार!

अकोला: विदर्भात तेल कंपन्यांचे इंधन डेपो वाढविण्याची शिफारस, राज्य शासनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी शनिवारी ह्यलोकमतह्णसोबत बातचित करताना दिली. जिल्ह्यातील गायगाव येथे तेल कंपन्यांच्या डेपोंना भेट दिल्यानंतर त्यांनी ह्यलोकमतह्णसोबत बातचित केली. पेट्रोल, डिझेल इत्यादी तेल कंपन्यांच्या डेपोंकडून महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींना कराच्या माध्यमातून महसूल प्राप्त होतो. त्यामुळे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नात भर पडत असून, त्या माध्यमातून संबंधित शहर आणि गावांचा विकास साधण्यास मदत होते. या पार्श्‍वभूमीवर विदर्भात तेल कंपन्यांचे जास्तीत जास्त डेपो सुरू करण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्यात येणार आहे. तेल कंपन्यांचे इंधन डेपो वाढविल्यास विदर्भातील विकासाला चालना मिळेल, असे डांगे यावेळी म्हणाले.

Web Title: Will advise to increase fuel depot in Vidarbha!