हुंड्यासाठी पत्नीचा छळ

By Admin | Updated: August 10, 2014 01:32 IST2014-08-10T01:32:10+5:302014-08-10T01:32:10+5:30

हुंड्यासाठी एका पतीने आपल्या पत्नीला क्रूर वागणूक देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. वैशाली सिद्धार्थ ढोके (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे.

Wife's torture for dowry | हुंड्यासाठी पत्नीचा छळ

हुंड्यासाठी पत्नीचा छळ

आत्महत्येस प्रवृत्त केले : पतीविरुद्ध गुन्हे दाखल
नागपूर : हुंड्यासाठी एका पतीने आपल्या पत्नीला क्रूर वागणूक देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. वैशाली सिद्धार्थ ढोके (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे.
गोधनी मार्गावरील शिवनगर, ठाकरे ले-आऊट येथील रहिवासी आरोपी सिद्धार्थ महादेव ढोके (वय ३५) याच्यासोबत वैशालीचे लग्न झाले होते. लग्नाच्या तीन महिन्यानंतरपासून सिद्धार्थ हुंड्यासाठी वैशालीचा छळ करू लागला. गेल्या काही दिवसांपासून तो वैशालीला क्रूरपणे वागवत होता. छोट्या छोट्या कारणावरून तिला अश्लील शिवीगाळ करून मारहाण करीत होता. या पार्श्वभूमीवर वैशाली २४ जुलैला रात्री ९.४० वाजता गंभीररीत्या भाजली. तिला मेयोत दाखल करण्यात आले. स्वयंपाक करताना स्टोव्हचा भडका उडाल्यामुळे वैशाली भाजल्याचे ढोके याने पोलिसांना सांगितले होते. २७ जुलैला तिचा मृत्यू झाला. दरम्यान, शुद्धोधन कवडू चव्हाण (वय २७, रा. पिंगळा, ता. पारशिवनी) यांनी गिट्टीखदान पोलिसांना तक्रार देऊन वैशालीच्या मृत्यूला तिचा पतीच कारणीभूत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपी सिद्धार्थ वैशालीचा हुंड्यासाठी छळ करीत होता. तिला तो सारखा मारहाण आणि शिवीगाळ करायचा, असेही चौकशीत उघड झाले. त्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ ढोकेविरुद्ध कलम ४९८(अ), ३०४(ब) अन्वये गुन्हे दाखल केले. त्याचा शोध सुरू आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Wife's torture for dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.