नागपूर : शेती व शेतकऱ्यांना जाेरदार तडाखा देणाऱ्या अवकाळी पावसाचा जाेर आता ओसरला आहे. ढगाळ वातावरणात सूर्याचेही दर्शन घडले. नाेव्हेंबरला सुरुवात झाली असून या आठवड्यात थंडीची चाहुल लागेल, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे नुकताच मावळलेला ऑक्टाेबर महिना नागपूरकर व वैदर्भियांसाठी तापमानाच्या बाबतीत दिलासादायक ठरला, कारण यंदा ऑक्टाेबर हिटचा त्रास नागरिकांना फारसा जाणवला नाही.
दरवर्षी ऑक्टाेबर महिना विदर्भातील नागरिकांसाठी त्रासदायक असताे. ऑक्टाेबर सुरू हाेताच तापमानात माेठी वाढ हाेते. दुसरीकडे मान्सून निराेप घेतल्यानंतर वातावरणात उरलेल्या आर्द्रतेमुळे दमटपणा वाढताे. त्यामुळे तापमान अधिक तीव्रपणे जाणवते व उकाड्याचा त्रासही चिडचिड वाढविणारा असताे.
यंदा मात्र उलट परिस्थिती हाेती. एकतर मान्सूनने उशीरा निराेप घेतला. १५ ऑक्टाेबरपर्यंत पावसाचा मुक्काम हाेता. त्यानंतर दाेन-तीन दिवस तापमानात वाढ झाली पण पारा ३२ अंशाच्यावर गेला नाही. १८ व १९ ऑक्टाेबरला पुन्हा अवकाळीचे सावट तयार झाले व ढगाळ वातावरणामुळे सूर्याच्या तापाला अडथडा निर्माण झाला. त्यानंतर पुन्हा २३ तारखेपासून अवकाळीची स्थिती तयार झाली, जी महिना संपेपर्यंत कायम हाेती. या काळात सातत्याने आकाश ढगाळलेले हाेते व दाेन दिवस तर जाेरदार पावसाचा तडाखा बसला. म्हणजे यंदा ऑक्टाेबर महिन्यात केवळ दाेन दिवस कमाल तापमान ३२ ते ३३ अंशाच्या दरम्यान गेले. बाकी दिवस ते सरासरीत किंवा सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने खाली राहिले. पावसाच्या दिवसात ते २६ अंशापर्यंत खाली गेले हाेते.
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले, हवामान विभागाने १ ऑक्टाेबरलाच यावर्षी या महिन्याचे तापमान कमी राहिल, असा अंदाज वर्तवला हाेता. हा काळ चक्रीवादळाचा असताे व यंदा ते सक्रिय राहतील, असे निरीक्षण विभागाने नाेंदविले हाेते. झालेही तसेच. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे दिवसाचे तापमान कमी राहिले. ते संपूर्ण महिना सरासरीत किंवा त्यापेक्षा २ ते ४ अंशाने खाली राहिले. अर्ध्यापेक्षा जास्त ऑक्टाेबर महिना ढगाळ वातावरणात गेल्याने सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पाेहचली नाही. त्यामुळे जमिन तापली नाही व त्यातून उष्णतेचे उत्सर्जन झाले नाही. रात्रीचे किमान तापमानही २० ते २२ अंशाच्या दरम्यान म्हणजे सरासरीत हाेते. त्यामुळे यंदा उष्णतेचा फारसा त्रास झाला नाही, असे खुळे यांनी स्पष्ट केले.
वीजेची मागणीही कमी राहिली
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा ऑक्टाेबर महिन्यात नेहमीच्या तुलनेत वीजेची मागणी कमी राहिली. गेल्या अनेक वर्षात अधिक पुरवठा करावा लागताे, ताे यंदा कमी लागल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Vidarbha experienced a milder October due to unseasonal rains and cloud cover. Temperatures remained average, with minimal rise, unlike previous years. Power demand was also lower, offering respite from typical October heat.
Web Summary : विदर्भ में बेमौसम बारिश और बादल छाए रहने के कारण अक्टूबर का मौसम हल्का रहा। तापमान औसत रहा, जिसमें पिछले वर्षों की तुलना में कम वृद्धि हुई। बिजली की मांग भी कम रही, जिससे अक्टूबर की गर्मी से राहत मिली।