शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तर व्हीसीएच्या अवैध बांधकामावर कारवाई का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:24 IST

नागपूर महानगर विकास प्राधिकरणाकडून छोट्या व्यापाऱ्यांना वेठीस धरून त्यांना नोटीस बजावत आहे. मात्र शहर व शहराबाहेरच्या भागात उभारण्यात आलेल्या मोठ्या अवैध इमारती आहेत. यात व्हीसीए स्टेडियमचाही समावेश आहे. स्टेडियमच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. प्राधिकरण व्हीसीएला नोटीस बजावून कारवाई का करीत नाही. व्यापाऱ्याप्रमाणे व्हीसीएला नोटीस बजावून कारवाई करावी. अशी मागणी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महानगर आयुक्त शीतल उगले यांच्याकडे केली.

ठळक मुद्देजय जवान जय किसानचा सवाल : महानगर आयुक्तांशी शिष्टमंडळाची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगर विकास प्राधिकरणाकडून छोट्या व्यापाऱ्यांना वेठीस धरून त्यांना नोटीस बजावत आहे. मात्र शहर व शहराबाहेरच्या भागात उभारण्यात आलेल्या मोठ्या अवैध इमारती आहेत. यात व्हीसीए स्टेडियमचाही समावेश आहे. स्टेडियमच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. प्राधिकरण व्हीसीएला नोटीस बजावून कारवाई का करीत नाही. व्यापाऱ्याप्रमाणे व्हीसीएला नोटीस बजावून कारवाई करावी. अशी मागणी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महानगर आयुक्त शीतल उगले यांच्याकडे केली.हॉलक्रो कंपनीच्या विकास आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळताच ७१९ गावांतील २ लाख घरे व सुमारे १० लाख रहिवासी भूखंड अनधिकृत ठरविण्यात आलेली आहेत. तसेच मागील २५ वर्षापासून सुरू असलेले विविध औद्योगिक कारखाने, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने अशी ५० बांधकामे अवैध ठरविण्यात आलेली आहे. यातून २ लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दोषपूर्ण आराखड्यामुळे लोकांचा रोजगार जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा आराखडा रद्द करण्यात यावा, अशी मागणी पवार यांनी केली.या सर्व प्रतिष्ठानांनी बांधकाम करताना ग्रामपंचायतीची मंजुरी घेतलेली आहे. त्यावेळी प्राधिकरण अस्तित्वात नव्हते. आता प्राधिकरण ही बांधकामे अवैध ठरवित आहे. ५० लाख ते २ कोटींचे प्रशमन व विकास शुल्क आकारून बांधकाम पाडण्याचा इशारा दिला जात आहे. यामुळे हॉलक्रो कंपनीने तयार केलेला दोषपूर्ण विकास आराखडा रद्द करून शासनाने स्वतंत्र प्रक्रिया राबवून नवीन आराखडा तयार करावा. प्राधिकरणने ६ कोटीं १५ लाख ७० हजार बेकायदा वसूल केले. ते परत करण्याची अशी मागणी पवार यांनी केली. यातून योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन उगले यांनी दिले. शिष्टमंडळात अरुण बनकर, विजयकुमार शिंदे, किशोर चोपडे, रविशंकर मांडवकर, मिलिंद महादेवकर, उत्तम सुळके आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbha Cricket Association, Jamthaविदर्भ क्रिकेट असोसिएशन जामठाNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका