शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बोर्डाच्या परीक्षेत का होत आहे विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 11:26 PM

गेल्या काही वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्य शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये भरमसाट वाढ दिसून येत आहे. मुलांच्या गुणांमध्ये झालेली ही वाढ चर्चेचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांना ९०-९५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळण्यामागे कारण काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्दे‘इंटर्नल मार्क्स’ची मदत : सुविधा वाढीमुळे गुणवाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या काही वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्य शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये भरमसाट वाढ दिसून येत आहे. मुलांच्या गुणांमध्ये झालेली ही वाढ चर्चेचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांना ९०-९५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळण्यामागे कारण काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.याबाबत विचार केल्यास २००३ च्या आधीपर्यंत बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३ ते ९५ टक्केच्या आसपास मर्यादित राहत होती. त्यातही ९० टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प असायची. यानंतर मात्र गुणांमध्ये आश्चर्यकारक वाढ दिसून येत आहे. मुख्यत्वे २००४ नंतरपासून ही वाढ दिसून येत आहे. आधी सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाली व त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये. सीबीएसई अभ्यासक्रमाच्या तज्ज्ञांच्या मतानुसार विद्यार्थ्यांच्या मनात असलेली परीक्षेबद्दलची भीती काढण्यासाठी बोर्डाने अनेक प्रकारचे बदल केले. मूल्यांकन प्रणालीतही हे बदल करण्यात आले. या बदलांतर्गत २००६ मध्ये सतत मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालात मोठी वाढ झाली.सुधारणांतर्गत सीबीएसईने २००६ मध्ये एक नवीन धोरण स्वीकारले होते. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा द्यायची नाही त्यांच्यासाठी शाळाअंतर्गत परीक्षा देण्याचा पर्याय खुला करण्यात आला. शाळाअंतर्गत परीक्षेच्या पर्यायामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली. ही स्थिती पाहून राज्य शिक्षण मंडळातर्फे राज्यातील कुठल्याही शाळेतून अंतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ वीमध्ये प्रवेश देण्यास नकार देण्यात आला. हा निर्णय मागे घ्यावा म्हणून सीबीएसईचे तत्कालीन संचालक विनीत जोशी यांनी राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा केली. मात्र विभागाने निर्णय बदलण्यास नकार दिल्याने जोशी यांना मागे हटावे लागले. यामुळे शाळाअंतर्गत परीक्षेचा फॉर्म्युला महाराष्ट्रात  बंद झाला.इंटर्नल मार्क्सची प्रक्रिया स्वीकारलीसीबीएसईने दहावी, बारावीच्या परीक्षेत इंटर्नल मार्क्सचे धोरण लागू केले. यानंतर राज्याच्या शिक्षण मंत्र्यानेही इंटर्नल मार्क्स देण्याची पद्धत राज्यात लागू केली. तत्कालिन शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी बोर्ड परीक्षेत मौखिक परीक्षेचे तंत्र लागू केले. सीबीएसईच्या इंटर्नल मार्क्सच्या धोरणामुळे राज्य बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी स्पर्धेत मागे पडत असल्याचा त्यांचा तर्क होता.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८nagpurनागपूर