मैत्रिणीसोबत का बोलू देत नाही.. असे म्हणत तिच्या वडील व भावावर केला हल्ला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 07:20 IST2021-08-26T07:20:00+5:302021-08-26T07:20:02+5:30
Nagpur News बोलण्यास मनाई केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने साथीदारांच्या मदतीने विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिच्या वडील आणि भावाला जखमी केले. ही घटना मंगळवारी रात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मैत्रिणीसोबत का बोलू देत नाही.. असे म्हणत तिच्या वडील व भावावर केला हल्ला...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोलण्यास मनाई केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने साथीदारांच्या मदतीने विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिच्या वडील आणि भावाला जखमी केले. ही घटना मंगळवारी रात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
यशोधरानगर येथील रहिवासी २० वर्षीय वीणा मंगळवारी सायंकाळी सात वाजता आपल्या घरी होती. त्यावेळी तिच्या कॉलेजमधील मित्र यश बोरकर आपल्या दोन साथीदारांसह तिच्या घरी आला. तो वीणासोबत गप्पा मारत होता. परंतु वीणाच्या वडिलांनी तिला यशसोबत बोलण्यास मनाई केली. त्यामुळे संतप्त झालेल्या यशने वीणाच्या वडिलांना शिवीगाळ केली. हे पाहून वीणाचा भाऊ यशची समजूत काढू लागला. परंतु यशने वीणाचे वडील आणि भावावर हल्ला केला. दोघांनाही गंभीर जखमी करून तो साथीदारांसह फरार झाला. यशोधरानगर पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. वीणा यशबाबत अधिक माहिती नसल्याचे सांगत आहे.
..........