मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
By योगेश पांडे | Updated: September 8, 2025 17:20 IST2025-09-08T17:19:22+5:302025-09-08T17:20:29+5:30
Nagpur : 'सोलर इंडस्ट्रीज'मध्ये झालेल्या स्फोटामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या कंपनीने भारतीय लष्कराला आत्मनिर्भर करण्यात मौलिक योगदान दिले आहे. शासकीय यंत्रणांकडून कंपनीकडेच अंगुलीनिर्देश करण्याचे प्रयत्न सुरू होतील.

Why do factories explode despite mock drills and technology? Do systems like 'PESO' need to change their operating procedures?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : 'सोलर इंडस्ट्रीज'मध्ये झालेल्या स्फोटामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या कंपनीने भारतीय लष्कराला आत्मनिर्भर करण्यात मौलिक योगदान दिले आहे. शासकीय यंत्रणांकडून कंपनीकडेच अंगुलीनिर्देश करण्याचे प्रयत्न सुरू होतील. मात्र, स्फोटक कंपन्यांचा मोठा डोलारा सांभाळणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर या स्फोटातून अनेक सवाल उपस्थित होत आहेत. 'ऑपरेशन सिंदूर 'नंतर 'सोलार'चे महत्त्व जगासमोर आले असताना या स्फोटाचे हादरे नागपूरपासून ते थेट दिल्लीपर्यंत बसले आहेत. 'पेसो' सारख्या यंत्रणा आता तरी जाग्या होऊन कार्यप्रणालीत आवश्यक ते बदल करतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अनेक स्फोटक कंपन्यांची सुरक्षा नियमावली बनविणे व त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी 'पेसो' (पेट्रोलिअम अॅड एक्स्प्लोजिव्हस सेफ्टी ऑर्गनायझेशन) ची असते.
'पेसो'चे अधिकारी पेपरवर्कच्या बाबतीत एकदम 'परफेक्ट' आहेत. त्यामुळे अनेक स्फोटक कंपन्यांमध्ये पेपरवर नियमितपणे मॉकड्रिल्स व तपासणी होत असल्याचे दिसून येते. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कितपत होते हे कामगारांशी चर्चा केल्यावर नेमके लक्षात येते. 'सोलार'च्या प्रकरणात कंपनीकडून नेहमीच सुरक्षा उपकरणांना महत्त्व देण्यात आले आहे. मात्र, ती उपकरणे व एकूण प्रणाली नियमानुसार काम करत आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी 'पेसो'ची असते. 'पेसो'तील आर्थिक कारभार काही काळाअगोदर समोर आला होता. तेव्हापासूनच तेथील कार्यप्रणालीवर शंका उपस्थित करण्यात येऊ लागली होती. आता 'सोलार 'मधील स्फोटानंतर 'पेसो'चे अधिकारी एकूण कार्यप्रणाली सुरक्षा' सेंट्रिक' करण्यावर भर देतील अशी अपेक्षा आहे.
कामगारांच्या सुरक्षेवर भर देण्याची गरज
स्फोटक कारखाना म्हटला की कामगार आरडीएक्स, बारूदच्या आजूबाजूला काम करणार हे अपेक्षितच आहे. त्यात धोका असला तरी 'पापी पेट'साठी त्यांना ते करावे लागते. मोठ्या कंपन्या कामगारांना योग्य प्रशिक्षणदेखील देतात. मात्र, लहान कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेवर हवा तसा भर देण्यात येत नाही. 'सोलार'मध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक युनिटमध्ये २४ बाय ७ प्रत्येक हालचाल टिपल्या जाते व सुरक्षा पथक त्यावर लक्ष ठेवत असते.
'क्रिस्टलायझेशन' इमारतीत
स्फोटकांना वाळवत असताना तापमान नियंत्रणाबाहेर गेले व स्फोट झाला. मात्र, ही बाब योग्य वेळी लक्षात आल्याने कामगारांना बाहेर पळण्याचा अलर्ट देता आला व त्यामुळे मृत्यूसंख्या मर्यादित राहिली. मात्र, प्रत्येक वेळी अशी संधी मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळेच 'एआय' व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामगारांच्या सुरक्षेवर जास्तीत जास्त भर देण्याची आवश्यकता आहे.
लहान कंपन्या कधी होणार गंभीर ?
सोलारमधील स्फोटामुळे स्फोटक कंपन्यांमधील होणाऱ्या दुर्घटना व त्यात होणारे मृत्यू हा विषय परत ऐरणीवर आला आहे. सोलारमधील जखमींना तातडीने कंपनीच्या रुग्णवाहिकांनीच दवाखान्यात हलविण्यात आले होते व कंपनीचे इतर अधिकारी रात्रभर दवाखान्यात होते. मात्र, काही कंपन्यांमध्ये तर साधी रुग्णवाहिकादेखील २४ बाय ७ उपलब्ध नसते. नागपुरातील बाजारगाव येथील चामुंडी एक्सप्लोजिव्हमध्ये झालेल्या स्फोटात हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला होता. कंपनीच्या भूमिकेविषयी माहिती देण्याची जबाबदारीदेखील कुणाकडे आहे हे अधिकाऱ्यांना माहिती नव्हते. तेथे आवश्यक प्रमाणात रुग्णवाहिकादेखील नव्हत्या.
कामगारांच्या सुरक्षेवर भर देण्याची गरज
स्फोटक कारखाना म्हटला की कामगार आरडीएक्स, बारूदच्या आजूबाजूला काम करणार हे अपेक्षितच आहे. त्यात धोका असला तरी 'पापी पेट'साठी त्यांना ते करावे लागते. मोठ्या कंपन्या कामगारांना योग्य प्रशिक्षणदेखील देतात. मात्र, लहान कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेवर हवा तसा भर देण्यात येत नाही. 'सोलारमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक युनिटमध्ये २४ बाय ७ प्रत्येक हालचाल टिपल्या जाते व सुरक्षा पथक त्यावर लक्ष ठेवत असते.
'क्रिस्टलायझेशन' इमारतीत स्फोटकांना वाळवत असताना तापमान नियंत्रणाबाहेर गेले व स्फोट झाला. मात्र, ही बाब योग्य वेळी लक्षात आल्याने कामगारांना बाहेर पळण्याचा अलर्ट देता आला व त्यामुळे मृत्यूसंख्या मर्यादित राहिली. मात्र, प्रत्येक वेळी अशी संधी मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळेच 'एआय' व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामगारांच्या सुरक्षेवर जास्तीत जास्त भर देण्याची आवश्यकता आहे.