शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

'एमकॉम'च्या निकालाला ९७ दिवस का लागले ? विधीसभा सदस्याचा सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 9:25 PM

‘एमकॉम’च्या (प्रोफेशनल) तृृतीय सत्राचा निकाल उशिरा घोषित झाला. हा निकाल घोषित करायला ९७ दिवसाचा कालावधी का लागला, असा प्रश्न उपस्थित करत विधीसभा सदस्य प्रवीण उदापुरे यांनी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देनवीन वेळापत्रक तयार करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘एमकॉम’च्या (प्रोफेशनल) तृृतीय सत्राचा निकाल उशिरा घोषित झाला. हा निकाल घोषित करायला ९७ दिवसाचा कालावधी का लागला, असा प्रश्न उपस्थित करत विधीसभा सदस्य प्रवीण उदापुरे यांनी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.‘एमकॉम’च्या तृतीय सत्राची परीक्षा १८ नोव्हेंबर रोजी संपली. परीक्षा आटोपून दोन महिने सरल्यावरदेखील निकाल जाहीर झाला नव्हता. अखेर २२ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाला. ४ मार्च रोजी लगेच पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यावर प्रवीण उदापुरे यांनी आक्षेप घेतला आहे. विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षेचा निकाल ३० दिवसाच्या आत लागणे आवश्यक आहे. परंतु १८ नोव्हेंबरला संपलेल्या या परीक्षेचा निकाल लागण्यास तब्बल ९७ दिवसाचा कालावधी लागला आहे. विशेष म्हणजे फेरपरीक्षा लगेच ४ मार्चपासून आयोजित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. फेरपरीक्षेचा तसेच पुनर्मूल्यांकनाचा अर्ज कसा करावा या चिंतेत विद्यार्थी सापडले आहे. यासंबंधात जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उदापुरे यांनी केला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्यात यावी. तसेच जर पुरवणी परीक्षा एक महिना पुढे ढकलली नाही तर कुलगुरूंना घेराव करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा