बोथलीत होणार का परिवर्तन ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST2021-01-13T04:21:10+5:302021-01-13T04:21:10+5:30
बुटीबोरी : नागपूर ग्रामीण तालुक्यातील बोथली ग्रामपंचायतीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत होताना दिसत आहे. येथे पाच प्रभागातील ...

बोथलीत होणार का परिवर्तन ?
बुटीबोरी : नागपूर ग्रामीण तालुक्यातील बोथली ग्रामपंचायतीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत होताना दिसत आहे. येथे पाच प्रभागातील १५ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीवर गतवेळी भाजप समर्थित पॅनेलचे वर्चस्व होते. मात्र, बोरखेडी (फाटक) जिल्हा परिषद सर्कलमध्ये राष्ट्रवादीला मिळालेल्या विजयामुळे येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या आशा बळावल्या आहेत. मात्र, प्रहार समर्थित पॅनेलने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने याचा फटका कुणाला बसतो, हेही येथे महत्त्वाचे ठरणार आहे. बोथली ग्रामपंचायत अंतर्गत एकूण पाच प्रभाग आहेत. येथे १५ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. यात १६ पुरुष तर २० महिला उमेदवारांचा समावेश आहे. यापैकी १५ उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना समर्थित महाविकास आघाडी पॅनेलचे, १५ भाजप समर्थित ग्रामविकास आघाडी पॅनेलचे, तर प्रहार समर्थित आदर्श ग्रामविकास आघाडीचे तीन व तीन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
एकूण प्रभाग : ५
एकूण सदस्य : १५
एकूण उमेदवार : ३६
एकूण मतदार : ६५९१
पुरुष मतदार : ३५८७
महिला मतदार : ३००४