मराठी भाषिकांचे दोन राज्य का होऊ शकत नाही : राम नेवलेंचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 23:45 IST2020-02-21T23:43:19+5:302020-02-21T23:45:07+5:30
हिंदी व तेलगू भाषिकांचे एकापेक्षा अधिक राज्ये होऊ शकतात तर मराठी भाषिकांची दोन राज्ये का होऊ शकत नाही असा सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी उपस्थित केला आहे.

मराठी भाषिकांचे दोन राज्य का होऊ शकत नाही : राम नेवलेंचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदी व तेलगू भाषिकांचे एकापेक्षा अधिक राज्ये होऊ शकतात तर मराठी भाषिकांची दोन राज्ये का होऊ शकत नाही असा सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एक भाषा असूनही आपण एकत्र का राहू शकत नाही असे वक्तव्य केले. त्याचा नेवले यांनी निषेध केला आहे. शोषण होत असताना व गुलामासारखी वागणूक मिळत असताना विदर्भाने महाराष्ट्राचा भाग होऊन का रहावे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तरांचल ही नवीन हिंदी भाषिक राज्ये तयार केली होती. त्यावेळी संघाने विरोध केला नाही. भाजपाने १९९७ मध्ये विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ ठराव पारित केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य करण्याचे आश्वासन दिले होते. असे असताना जोशी यांनी विदर्भाचा विरोध करणे दुर्दैवी आहे असे नेवले यांनी म्हटले आहे.