शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा : आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:29 IST

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. लोक सहभागातून जनसमृध्दीकडे नेणारा हा प्रवास खरच नेत्रदीपक आहे. या प्रवासाचा सातत्याने विस्तार व्हावा आणि एक दिवस समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा, अशी अपेक्षा अभिनेता आमिर खान याने व्यक्त केली.

ठळक मुद्देपत्नी किरणसह मांडला ‘वॉटर कप-२०१८’ चा लेखाजोखा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. लोक सहभागातून जनसमृध्दीकडे नेणारा हा प्रवास खरच नेत्रदीपक आहे. या प्रवासाचा सातत्याने विस्तार व्हावा आणि एक दिवस समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा, अशी अपेक्षा अभिनेता आमिर खान याने व्यक्त केली. मंगळवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत आमिरने पत्नी किरणसह वॉटर कप-२०१८ चा लेखाजोखा मांडला. आमिर पुढे म्हणाला, यंदा वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे असा आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. पाणलोटसाठी यंदा २० हजार गावकऱ्यांना प्रशिक्षण दिले असून ते आपआपल्या गावात जाऊन इतर गावकऱ्यांना प्रशिक्षित करणार आहेत. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच मशीनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारून पाणी साठवण क्षमता निर्माण करणार आहेत, याकडेही आमिरने लक्ष वेधले.१ मे ला महाश्रमदानपाण्याच्या बचतीचा संदेश आणखी प्रभावीपणे देण्यासाठी पाणी फाऊंडेशनतर्फे १ मे रोजी महाश्रमदान आयोजित करण्यात आले आहे. या महाश्रमदानात सहभागासाठी आतापर्यंत सव्वा लाख जलमित्रांनी आपले नाव नोंदवले आहे. नावनोंदणीची ही प्रक्रिया २५ एप्रिलपर्यंत चालणार आहे, अशी माहिती आमिरने यावेळी दिली.‘आझाद’लाही कळते पाण्याचे मोलपाणी बचतीची ही मोहीम आम्ही स्वत:च्या घरापासून सुरू केली. मी आणि किरण दोघेही पाण्याचा काटकसरीने उपयोग करतो. इतकेच नाही तर आमचा मुलगा आझाद यालाही आम्ही हीच शिकवण दिली आहे. तो आता फक्त सहा वर्षांचा आहे. पण, त्यालाही पाण्याचे मोल कळते. तो अजिबात पाणी वाया घालवत नाही, हे आमिरने आवर्जून सांगितले.गावकऱ्यांची एकता बघून बळ मिळतेया पत्रकार परिषदेतनंतर शहरातील प्रमुख दैैनिकांच्या संपादकांशी आमिर व किरण खानने अनौपचारिक चर्चा केली. या चर्चेत आमिर म्हणाला, गावातील लोक खूप प्रामाणिक व धैर्यवान आहेत. प्रतिकूल स्थितीतही त्यांनी आशा सोडली नाही. पाणलोट विकासाच्या कामावर त्यांची एकता मी बघितली आहे व त्यातून मला मोठे बळही मिळत असते. याच क्रमात लोकमतने घेतलेला पुढाकारही महत्त्वाचा आहे. लोकमतने राबविलेल्या जलमित्र अभियानाचे चांगले परिणाम राज्यात दिसल्याचे आमिरने कौतुकाने सांगितले. या कामात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. पाणी फाऊंडेशनच्या प्रयत्नांमुळे अनेक गावांची आर्थिक स्थिती बदलली असून, आता शेतकरी वर्षातून दोनदा उत्पादन घेत आहेत, याकडे किरणने संपादकांचे लक्ष वेधले.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर