शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सावनेरमध्ये केदारांना कोण रोखणार? भाजपाचे दिग्गज नेते मैदानात

By जितेंद्र ढवळे | Updated: October 12, 2023 15:37 IST

२६ ग्रा.पं.साठी मोर्चेबांधणी 

नागपूर :काँग्रेसचा गड असलेल्या सावनेर तालुक्यात ७५ पैकी २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे गेली पाच टर्म या मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या आ. सुनील केदार यांचा विजय रथ कोण रोखणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गतवर्षी झालेल्या ग्रा.पं.निवडणुकीत तालुक्यातील बहुतांश ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित गटाला विजय मिळाला होता. त्यामुळे पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत केदार यांचा विजयरथ रोखण्यासाठी ग्रा.पं.निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाने दंड थोपाटले आहेत. केदार यांना शह देण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. राजीव पोतद्दार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, डॉ. आशिष देशमुख हेही मैदानात उतरले आहे. भाजप नेते गोवोगावी जावून मतदारांशी संवाद साधत आहेत.

काँग्रेसकडून नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे,  माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे ग्रा.पं.साठी मोर्चेबांधणी करित आहेत. तालुक्यात निवडणूक होत असलेल्या काही ग्रा.पं. जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे आणि माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या सर्कलमध्ये मोडतात. त्यामुळे येथे कुणाचे सरपंच विजयी होतात, हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काँग्रेसचे सहा जि.प.सदस्य तर १२ पंचायत समिती सदस्य 

सावनेर मतदार संघात मोडणारे सहा जि.प.सर्कल आणि १२ पंचायत समिती गणात सध्या काँग्रेसचे वर्चस्व आहे तर सावनेर तालुक्यातील बहुतांश ग्रा.पं.मध्ये कॉंग्रेस समर्थित गटाचे सरपंच आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSunil Kedarसुनील केदारcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूकnagpurनागपूर