थडीपवनीत कोण मारणार मैदान?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST2021-01-13T04:21:04+5:302021-01-13T04:21:04+5:30
श्याम नाडेकर नरखेड: नरखेड तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या थडीपवनी (बरडपवनी) ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी पारंपरिक विरोधक पुन्हा एकदा आमनेसामने आले ...

थडीपवनीत कोण मारणार मैदान?
श्याम नाडेकर
नरखेड: नरखेड तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या थडीपवनी (बरडपवनी) ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी पारंपरिक विरोधक पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. येथे राष्ट्रवादी पुरस्कृत ग्राम विकास पॅनेल व शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनेल यांच्यात एकास एक अशी लढत होत आहे.
गत दहा वर्षे या ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते बंडुपंत उमरकर यांच्या गटाचे वर्चस्व आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू हरणे, माजी पंचायत समिती सदस्य संध्या मातकर, विजय गांधी यांनी परिवर्तन पॅनेलची धुरा सांभाळली आहे. २०१२ साली झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत संध्या मातकर यांनी बंडुपंत उमरकर यांच्या पत्नी नीलिमा उमरकर यांचा पराभव केला होता. २०२० च्या पंचायत समिती निवडणुकीत बंडुपंत उमरकर यांचे चिरंजीव मयूर उमरकर यांनी विजय मिळविला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पांरपरिक लढतीत यावेळी मतदार कोणाला पसंती देतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहेत. येथे प्रभाग क्रमांक १ मध्ये ग्राम विकास पॅनेलकडून सुधाकर संपत मरसकोल्हे, नीलिमा बंडुपंत उमरकर, लता सुरेश पोतदार यांच्याविरुद्ध परिवर्तन पॅनलचे अमोल भानुदास मरसकोल्हे, चित्रलेखा सुनील मातकर, अंजू विजय गांधी रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये ग्राम विकास पॅनेलकडून नाना बाजीराव सोनुले, विजय रामकीसन पालीवाल, शीतल योगराज धावडे यांच्याविरुद्ध परिवर्तन पॅनलचे भारत किसनाजी सोनुले, राजेश वासुदेव मातकर, ज्योती प्रशांत पोतदार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ३ मध्ये ग्रामविकास पॅनलकडून नंदकिशोर कांशीराम पुंड, साधना संजय सोनूले, शालू दिवाकर गायनेर यांच्याविरुद्ध परिवर्तन पॅनलचे शीला जानराव मोहिजे, किशोर बाबाराव पुंड, जयश्री प्रशांत सोनुले रिंगणात आहेत.
एकूण प्रभाग : ३
एकूण सदस्य : ९
एकूण उमेदवार - १८
एकूण मतदार : २४४२
पुरुष मतदार : १२९२
महिला मतदार : ११५०