कुणाचा झेंडा फडकणार?

By Admin | Updated: September 22, 2014 00:54 IST2014-09-22T00:54:48+5:302014-09-22T00:54:48+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या यंदाच्या निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर चुरस पहायला मिळणार आहे. २३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन प्रतिनिधी

Who will blow a flag? | कुणाचा झेंडा फडकणार?

कुणाचा झेंडा फडकणार?

नागपूर विद्यापीठ : निवडणुकांमुळे महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये चुरस
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या यंदाच्या निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर चुरस पहायला मिळणार आहे. २३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन प्रतिनिधी तर २९ सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन सचिवांची निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी संघटना प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांच्या तारखांबाबत अद्यापही ‘सस्पेन्स’ कायमच आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार महाविद्यालयीन सचिवांचा निवडीसाठी २९ सप्टेंबरला निवडणुका होतील. त्यातून निवड झालेल्या सचिवांतून विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष व सचिवाची निवड करण्यात येईल. ही निवड आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदादेखील विद्यापीठाने विलंबाने वेळापत्रक तयार केले व महाविद्यालयांमध्ये सचिव निवडीसाठी पत्र पाठविले आहे. त्यानुसार २३ सप्टेंबरपर्यंत ‘सीआर’ निवडीची प्रक्रिया करून त्यातून महाविद्यालयीन प्रतिनिधीसाठी २९ सप्टेंबरला निवडणुका घेण्यात येईल. यात आठ रोटेशनमध्ये असलेल्या महाविद्यालयांचाही समावेश आहे. या निवडणुकीत विजयी झालेल्या सचिवांचे अर्ज ७ आॅक्टोबरपर्यत पाठवायचे आहे. त्यातून सात नामनिर्देशित सदस्यांची नावे निवडल्या जातील.
कुठे उत्साह, कुठे शांतता
विद्यार्थी संघटनांच्या अस्तित्वाची लढाई असलेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत बरीच धामधूम असते. महाविद्यालय स्तरावर अधिकाधिक विद्यार्थी प्रतिनिधी निवडुन आणण्यासाठी संघटना प्रयत्नरत असतात. विद्यार्थी परिषदेवर आपला झेंडा लावण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, एनएसयुआय आणि विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद यांच्या चुरस असते. यंदा संघटनांतील अनेक कार्यकर्ते विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे काही संघटनांमध्ये प्रचंड उत्साह तर कुठे शांतता असे वातावरण दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
पारदर्शक होणार निवडणुका
निवडणूक प्रक्रियेला पारदर्शक करण्यासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुप कुमार यांनी निवडणूक निरीक्षण समिती तयार केली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत तर सचिव डॉ.धनंजय वेळूकर हे आहेत. व्यवस्थापन परिषद सदस्य महेंद्र निंबर्ते व डॉ.अर्चना नेरकर यांचादेखील यात सदस्य म्हणून समावेश आहे. विद्यार्थी व संघटना विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या या निवडणुकांशी संबंधित तक्रारी या समितीकडे करू शकतात. राज्यात पहिल्यांदाच निवडणूक निरीक्षण समितीची जबाबदारी इतक्या मोठ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Who will blow a flag?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.