लोकमत न्यूज नेटवर्कसावनेर : सावनेर नगरपरिषदेत २३ नगरसेवकांसह नगरसेवकांपैकी तब्बल २१ नगराध्यक्षपदावर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. पीपल्स रिपब्लिकन पार्टी (नगर आघाडी) चे केवळ दोन नगरसेवक निवडून आले. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने सत्ता स्थापनेत कोणतीही अडचण नाही. आता उपाध्यक्षपद, विविध विषय समित्यांचे सभापती व स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपतील इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. या पदांसाठी अनेक नगरसेवकांनी जोरदार फिल्डिंग लावली. पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगरीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
नगरसेवकांकडून वरिष्ठ पातळीवर संपर्क साधण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. नगरपरिषद उपाध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नगरपरिषदेच्या दैनंदिन कार्यभार, नियोजन आणि प्रशासकीय कामकाजात या पदाची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे हे पद मिळवण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्याचप्रमाणे बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण, महिला व बालकल्याण आदी समित्यांच्या सभापतिपदासाठीही स्पर्धा निर्माण झाली.
स्वीकृत सदस्यांसाठी या नावांची चर्चा
स्वीकृत सदस्यपदासाठी डॉ. विजय धोटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे, नगराध्यक्षांचे पती व भाजप तालुकाध्यक्ष मंदार मंगळे, माजी सभापती तुषार उमाटे आर्दीच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. आता ऐनवेळी कुणाच्या गळ्यात कोणत्या पदाची माळ पडते, याकडे सावनेरवासीयांचे लक्ष लागले आहे.
ही नावे आहेत चर्चेत
उपाध्यक्षपदासाठी भीमराव घुगल, सोनाली तुषार उमाटे, सुभाष भुजाडे, माजी शहर अध्यक्ष रवींद्र ठाकूर आदींची नावे चर्चेत आहेत. भीमराव घुगल हे सलग चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. ते भाजप शहराध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे ते सपत्नीक विजयी झाले आहेत. नगरसेविका सोनाली उमाटे यांनी नगराध्यक्षपदासाठी तयारी केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. हा त्याग लक्षात घेता त्या उपाध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. सुभाष भुजाडे हे धनगर समाज व भटक्या जमातीचे एकमेव नगरसेवक आहेत. सावनेरमध्ये या समाजाची संख्या मोठी असल्याने सामाजिक समतोलाचा विचार करून त्यांचे नावही विचारात घेतले जाऊ शकते. अनुभवी नेतृत्व म्हणून रवींद्र ठाकूर यांचे नावही चर्चेत आहे.
Web Summary : BJP's dominance in Savner intensifies competition for key positions. Multiple corporators vie for deputy chairman, committee head roles. Discussions include potential nominated members. Political activity surges.
Web Summary : सावनेर में भाजपा के वर्चस्व के बाद प्रमुख पदों के लिए प्रतिस्पर्धा तेज। उपाध्यक्ष, समिति प्रमुख पदों के लिए कई पार्षद प्रयासरत। संभावित मनोनीत सदस्यों पर चर्चा। राजनीतिक गतिविधियाँ बढ़ीं।