जलालखेड्याचा कौल कुणाला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:08 IST2021-01-09T04:08:05+5:302021-01-09T04:08:05+5:30
जलालखेडा : नरखेड तालुक्याचे व्यावसायिक केंद्र असलेल्या जलालखेडा ग्रा.पं.ची सत्ता काबीज करण्यासाठी जलालखेडा सुधार समिती पॅनेल आणि जनक्रांती पॅनेलने ...

जलालखेड्याचा कौल कुणाला ?
जलालखेडा : नरखेड तालुक्याचे व्यावसायिक केंद्र असलेल्या जलालखेडा ग्रा.पं.ची सत्ता काबीज करण्यासाठी जलालखेडा सुधार समिती पॅनेल आणि जनक्रांती पॅनेलने कंबर कसली आहे. १३ सदस्यीय असलेल्या या ग्रा.पं.साठी २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. येथे जनक्रांती पॅनलने १३ जागेवर उमेदवार उभे केले आहे. सत्ताधारी सुधार समितीने काही जुन्या तर काही नव्या युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे. हेच कॉम्बिनेशन जनक्रांती पॅनेलने उमेदवार निश्चित करताना ठेवले आहे. जलालखेडा सुधार समिती गत पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर मतदारांना मतांचा कौल मागत आहे तर जनक्रांती पॅनेल परिवर्तनाची साद देत मतदारापर्यंत पोहोचत आहे. येथे वॉर्ड क्रमांक १ मध्ये सहाव्यांदा नशिब अजमाविणारे प्रमोद पेठे यांच्या विरोधात जनक्रांती पॅनलने सुरेश बारापात्रे यांना उमेदवारी दिली आहे. या वॉर्डातील इतर दोन जागांसाठी दोन्ही पॅनेलमध्ये एकास एक अशीच लढत होताना दिसत आहे.
वॉर्ड क्रमांक २ मध्ये सुधार समिती पॅनलने कुलदीप हिवरकर यांना यावेळीही संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात जनक्रांती पॅनलने मयूर सोनोने या नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. या वॉर्डातील दुसऱ्या जागेसाठी थेट लढत पाहायला मिळणार आहे. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये सुधार समितीने दीपक कळंबे तर जनक्रांती पॅनलने मयूर दंढारे याना संधी देण्यात आली आहे. याच वॉर्डात अपक्ष संदीप सातपुते यांनी दोन्ही पॅनेलला आव्हान दिले आहे. वॉर्ड क्रमांक ४ व ५ मध्ये दोन्ही पॅनलमध्ये थेट लढत होताना दिसत आहे.
अशी आहे जलालखेडा ग्रा.पं.
नागपूर-अमरावती महामार्गावर वसलेले जलालखेडा हे गाव पुरातन शिव मंदिर व किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. तालुक्यातील ही मोठी ग्रा.पं.आहे. जलालखेड्याची गत काही वर्षात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे.
एकूण वॉर्ड - ५
एकूण सदस्य - १३
एकूण उमेदवार - २७
एकूण मतदार - ३८२८
महिला मतदार - १८५५
पुरुष मतदार - १९७३