शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

...म्हणून देशात कुठेही स्फोट होवो, कनेक्शन जुळते महाराष्ट्रामधील 'नागपूर'शीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 06:51 IST

‘अँटिलिया’बाहेर सापडलेल्या स्फोटकांमुळे पुन्हा प्रकाशझोतात

नरेश डोंगरे नागपूर : देशात कुठेही स्फोट झाला किंवा स्फोटके सापडली, तर बऱ्याचदा त्या घडामोडीशी नागपूरचे नाव जोडले जाते. यापूर्वी हैदराबाद, कर्नाटकसह अनेक ठिकाणी झालेल्या स्फोटांत नागपुरात तयार झालेल्या स्फोटकांचा वापर झाल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे, तर गडचिरोली, छत्तीसगडपासून ते थेट काश्मीरपर्यंत ठिकठिकाणी जप्त करण्यात आलेली स्फोटकेही नागपुरातीलच असल्याचे उघड झाले होते. गुरुवारी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकेही नागपूरच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीतून बाहेर पडल्याचे उजेडात आल्याने तपास यंत्रणांच्या नजरा पुन्हा एकदा नागपूरकडे वळल्या आहेत. 

कोळसा खदानी, विहिरी, नियोजित मार्गांच्या मध्ये येणारे उंचवटे कापण्यासाठी (हिल कटिंग) जिलेटिन, ईमल्शनचा वापर होतो. अंबानी यांच्या बंगल्याजवळ आढळलेल्या कांड्या जिलेटिन नव्हे, तर ईमल्शन्स आहेत. जिलेटिनच्या तुलनेत त्याची स्फोटक क्षमता कमीच असते. जिलेटिन साधारणत: सात वर्षांपर्यंत उपयोगात आणले जाते. ईमल्शनची पॉवर केवळ सहा महिन्यांपर्यंतच असते. नंतर ते आपोआप निष्काम होतात.

मुंबई पोलिसांनी केली कंपनीकडे चौकशी

मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री सोलर एक्सप्लोसिव्ह प्रशासनाशी संपर्क साधून प्रदीर्घ चौकशी केली. कंपनीनेही स्फोटकाचे उत्पादन तसेच विक्रीच्या प्रक्रियेसंदर्भात खुलासा केला. ‘लोकमत’ने कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, काय विचारणा झाली ते सांगण्यास नकार दिला. मात्र, उत्पादन आणि वितरणासंबंधीची संपूर्ण प्रकिया शासकीय यंत्रणेच्या देखरेखीखाली केली जात असल्याचे सांगितले.  पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना संपर्क केला असता मुंबई पोलिसांकडून अद्याप यासंबंधाने संपर्क झाला नसल्याचे दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यात सात एक्सप्लोसिव्ह कंपन्या 

स्फोटके निर्मितीच्या एकट्या नागपूर जिल्ह्यात सोलार एक्सप्लोसिव्ह (चाकडोह, कोंढाळी), इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह (सावंगा, कोंढाळी), केलटेक एक्सप्लोसिव्ह (गरमसूर, कोंढाळी), ओरिएन्ट एक्सप्लोसिव्ह (शिवा खापरी, कोंढाळी), एसबीएल एक्सप्लोसिव्ह (कोतवाल बर्डी, कळमेश्वर), कमर्शिअल एक्सप्लोसिव्ह (गोंडखैरी, कळमेश्वर) आणि अम्मा एक्सप्लोसिव्ह (ढगा, कळमेश्वर) या सात एक्सप्लोसिव्ह कंपन्या आहेत. कांड्या, पावडर आणि द्रव स्वरूपातील स्फोटके त्या तयार करतात. 

अशी होते विक्री आणि नोंद

स्फोटकांच्या बॉक्सवर बॅच नंबर व बारकोड असतो. त्यावरून ‘पेसो’च्या पोर्टलवर त्याचा ट्रॅक मिळतो. जिलेटिन, ईमलशन्सच्या २०० कांड्या एका बॉक्समध्ये असतात. बहुतांश कंपन्या १००-२०० बॉक्सची मागणी करतात. nही स्फोटके कुणाला विकली, कुठून कुठे पोहोचली ही सगळी माहिती पोर्टलवर नोंदली जाते. मात्र, नंतर वितरकाकडून ती खुली करण्यात आल्यास त्याचा शोध लावणे कठीण जाते. हीच बाब हेरून दहशतवादी, नक्षलवादी घातपाती कृत्ये घडवून आणतात. 

टॅग्स :nagpurनागपूरMumbai policeमुंबई पोलीसMaharashtraमहाराष्ट्र