शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

कुठे अडली शिष्यवृत्ती?

By admin | Updated: August 26, 2016 02:46 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘लोकमत’मध्ये २२ आॅगस्ट रोजी प्रकाशित ‘कुठे अडली शिष्यवृत्ती’

‘लोकमत’च्या बातमीची दखल : हायकोर्टाने दाखल केली याचिकानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘लोकमत’मध्ये २२ आॅगस्ट रोजी प्रकाशित ‘कुठे अडली शिष्यवृत्ती’ या बातमीची दखल घेऊन स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने याप्रकरणात अ‍ॅड. नहुश खुबाळकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करून सहायक सरकारी वकील मेहरोज खान पठाण यांना यासंदर्भात शासनाकडून दोन आठवड्यांत माहिती घेण्यास सांगितले. उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. शासनाकडे हजारो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकीत आहे. समाजकल्याण विभागाने यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु त्यावर निर्णय झालेला नाही. आमदारांचे वेतन वाढले आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुसरीकडे देशाचे भविष्य समजले जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे निधी नाही. जिल्ह्यातील २० हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. यात १० हजारांवर विद्यार्थी अनुसूचित जाती तर, एवढेच विद्यार्थी ओबीसी प्रवर्गातील आहेत. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज सादर करावे लागतात. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात नागपूर जिल्ह्यातून १ लाख ५९ हजार ४२५ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. विद्यार्थ्यांनी अर्जाची एक प्रत महाविद्यालयाला सादर केली. यातील २८,९३० अर्ज अद्यापही विभागीय समाजकल्याण कार्यालयाला मिळाले नाही. तसेच, १०,२२५ अर्ज जिल्हा समाजकल्याण कार्यालयातून मिळालेले नाहीत अशी माहिती बातमीत देण्यात आली होती.(प्रतिनिधी)