शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
2
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
5
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
6
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
7
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
8
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
9
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
10
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
11
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
12
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
13
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
14
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
15
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
16
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
17
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
18
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
19
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
20
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक

आपण कधी गंभीर होणार?; कोरोनाच्या दहशतीत सतर्कता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:26 PM

एकीकडे कोरोनामुळे अख्खे प्रशासन वेठीस धरले असताना, नागपूरकर सर्रास त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सोमवारपासून नागपूर शहरात साथरोग कायदा लागू करून कलम १४४ ची नोटीस बजावली आहे. विविध कार्यक्रम, रॅली, प्रदर्शनांना परवानगी नाकारली आहे. तरीही असे कार्यक्रम आयोजित केल्यास कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. सरकार वारंवार गर्दी टाळण्याचे आवाहन करीत आहे. सतर्क राहा, सावधगिरी बाळगा अशा सूचना दिल्या जात आहेत. एकीकडे कोरोनामुळे अख्खे प्रशासन वेठीस धरले असताना, नागपूरकर सर्रास त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.कोरोनाचा प्रभाव कमी होण्यासाठी प्रशासनाने काही काळ अनावश्यक गोष्टींना टाळा, असे आवाहन केले आहे. पण सकाळी सकाळी पोह्यांच्या ठेल्यावरचे चित्र बघून आपण कधी गंभीर होणार? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सकाळी रस्त्याच्या कडेला पोहे विक्रेत्यांकडे तरुण, तरुणींपासून मोठ्यांचीही गर्दी दिसून आली. काही ज्येष्ठही उघड्यावर मनसोक्त गप्पाटप्पा करीत पोह्यावर ताव मारत होते. पोहे विक्रेता उघड्यावर पोहे बनवीत होता. पोहे खाल्ल्यानंतरच्या प्लेट पाण्याने केवळ विसळून पुन्हा त्यात पोहे देत होता. आरोग्य विभागाने दोन मीटरचे अंतर पाळा, असे आवाहन केले आहे. मात्र काही तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक गर्दी केल्यासारखे मस्त पोहे खात होते. शहरातील आशीर्वादनगर, म्हाळगीनगर, सक्करदरा, मानेवाडा चौक, मेडिकल चौक, अयोध्यानगर या रस्त्यावरील चाट सेंटर, इडली-डोसा विक्रेते, चहा विक्रेते यांच्या टपरीवरही असेच चित्र दिसून आले. ना नागरिकांना आरोग्याची भीती होती, ना विक्रेत्यांना. रस्त्यावरील अस्वच्छ वातावरण, उघड्यावरील अन्नपदार्थ हेसुद्धा कोरोनासाठी घातक ठरू शकते, याचेही भान नागरिकांना नसल्याचे दिसून आले.सायंकाळच्या सुमारासही बजाजनगर, आयटी पार्क, अंबाझरी, शंकरनगर, या भागातही लागणारे चायनीजचे ठेले, आयस्क्रीम विक्रेते यांच्याही दुकानांवर तरुणाईची गर्दी दिसून आली. येथेही विक्रेते कुठल्याही खबरदारीशिवाय आपला व्यवसाय करीत होते. तरुण मंडळीही ग्रुपने खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत होती.सतर्कता काहीच दिवसांसाठीकोरोनाचा प्रभाव सध्या शहरात जाणवतो आहे. त्यामुळे प्रत्येकाची सुरक्षा प्रत्येकाच्या हातात आहे. काही दिवसच काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या सवयी, आवडीनिवडी बाजूला ठेवून, कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही, याचे भान प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस