शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निकषांच्या अभावात अडकलेली गोंडी भाषा, अस्मितेच्या सन्मानाची प्रतीक्षा कधी संपणार?

By योगेश पांडे | Updated: March 23, 2026 13:08 IST

Nagpur : गोंडी भाषेला भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत स्थान देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे या भाषेच्या अस्मितेला अद्यापही हवा तो सन्मान मिळू शकलेला नाही.

डॉ. योगेश पांडेनागपूर : गोंडी भाषेला भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत स्थान देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे या भाषेच्या अस्मितेला अद्यापही हवा तो सन्मान मिळू शकलेला नाही. शिवाय केंद्र सरकारच्या उत्तराने हा प्रश्न पुन्हा एकदा 'निकषांच्या अभावात' अडकून पडल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हा केवळ प्रशासकीय किंवा तांत्रिक विषय नसून गोंड आदिवासी समाजाच्या अस्मिता, ओळख आणि सांस्कृतिक अस्तित्वाशी निगडित असल्याने या मुद्याला भावनिक व सामाजिक परिमाण लाभले आहे. त्यामुळे गोंडी भाषेच्या समावेशाबाबत अनिश्चितता कायम आहे.

भारतीय संविधानाच्या ८ व्या अनुसूचीमध्ये गोंडी भाषा समाविष्ट करून गोंडी भाषेला राज्य भाषेच्या दर्जा मिळविण्याकरिता केंद्र शासनाकडे महाराष्ट्र सरकारने शिफारस करावी, अशी जुनी मागणी आहे. गोंडी भाषा बोलणारे जवळपास तीन कोटी लोक असून, ज्यांची मातृभाषा गोंडी आहे, अशांची संख्या दोन कोटींच्या जवळपास आहे. त्याचप्रमाणे गाँड समूहात मोडणाऱ्या आदिवासी लोकांची संख्या भारतात जवळपास नऊ कोटी आहे. देशात तेरा राज्यांमध्ये ही गोंडी भाषा बोलली जाते; परंतु गोंडी भाषेचा एवढा मोठा व्याप असतानासुद्धा गोंडी भाषेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गोंडी भाषा लुप्त होऊ नये. यासाठी भारतीय संविधानाच्या अनुसूची ८ मध्ये गोंडी भाषा समाविष्ट करून तिला राज्य भाषेच्या दर्जा मिळावा, बऱ्याच काळापासून मागणी होत आहे. अगदी विधिमंडळ व संसदेतदेखील लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा मांडला; परंतु अद्यापही अस्मितेला सन्मान प्राप्त झालेला नाही.

भाषांच्या मान्यतेचा निर्णय होणार कसा?

याअगोदर पाहवा समिती (१९९६) आणि सीताकांत महापात्रा समिती १ (२००३) यांनी काही निकष निश्चित करण्याचा प्रयत्न केला होता. ते निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत. लोकसभेत काही दिवसांअगोदर केंद्राने या मुद्यावर भूमिका मांडली. कोणतीही भाषा आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ठोस निकष अस्तित्वात नाहीत. निश्चित निकष नसल्यामुळे या प्रक्रियेसाठी कोणतीही ठराविक वेळमर्यादा ठरवता येत नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. भाषा ही सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक बदलांनुसार विकसित होत असल्याने सर्वांसाठी समान मापदंड निश्चित करणे कठीण आहे. अशा स्थितीत भाषांच्या मान्यतेचा निर्णय नेमका कशावर होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

हजारो वर्षांच्या लोककथेची वाहक

गोंडी ही केवळ संवादाची भाषा नाही, ती हजारो वर्षांच्या परंपरा, लोककथा, श्रद्धा आणि जीवनपद्धतीची वाहक आहे. गोंड समाजासाठी ही भाषा म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा कणा आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गॉड आदिवासी समाज वास्तव्यास आहे. त्यामुळे राज्य सरकारने ठोस भूमिका घेत केंद्राकडे शिफारस करणे अपेक्षित आहे. केवळ मागणी पुरेशी नसून, त्यामागे राजकीय इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gondi language struggles for recognition amidst criteria absence; when will respect arrive?

Web Summary : Gondi language's inclusion in the Eighth Schedule remains uncertain due to administrative apathy and lack of clear criteria. Despite millions speaking it across India, its recognition faces hurdles, impacting the Gond tribal community's identity and cultural heritage. State support is crucial.
टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाnagpurनागपूर