शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘ओजस’ प्रकल्पातील शाळांना कधी मिळणार बुस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:55 IST

राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निर्माण करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला. तेजस आणि ओजस या प्रकल्पात शाळांची निवड करण्यात आली. तेजसमध्ये नागपूर विभागातील २ शाळा तर ओसजमध्ये विभागातील १८ शाळांची निवड करण्यात येणार होती. ओजसमध्ये १८ पैकी १३ शाळांची निवड झाली. यात नागपूर जि.प.च्या दोन शाळांचा समावेश होता. परंतु शाळांची निवड झाल्यानंतर वर्षभरापासून शिक्षण विभागाकडून त्यावर काहीच संस्कार झाले नाही. त्यामुळे हा प्रकल्प आता गुंडाळल्यागत आहे.

ठळक मुद्देनिवड होऊन लोटला १० महिन्यांचा कालावधी : नागपूर विभागात १३ शाळांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निर्माण करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला. तेजस आणि ओजस या प्रकल्पात शाळांची निवड करण्यात आली. तेजसमध्ये नागपूर विभागातील २ शाळा तर ओसजमध्ये विभागातील १८ शाळांची निवड करण्यात येणार होती. ओजसमध्ये १८ पैकी १३ शाळांची निवड झाली. यात नागपूर जि.प.च्या दोन शाळांचा समावेश होता. परंतु शाळांची निवड झाल्यानंतर वर्षभरापासून शिक्षण विभागाकडून त्यावर काहीच संस्कार झाले नाही. त्यामुळे हा प्रकल्प आता गुंडाळल्यागत आहे.कापोर्रेट शाळांप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी शासनाने ३० नोव्हेंबर २०१७ ला शासन निर्णय काढून राज्यातील सहा विभागात शंभर शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. यात तेजस प्रकल्पासाठी विभागातून २ शाळा व ओजस प्रकल्पासाठी विभागातून १८ शाळा निवडायच्या होत्या. तेजससाठी नागपूर विभागातून चंद्रपूर व गोंदिया जि.प.च्या शाळांची निवड करण्यात येणार आहे. पण या शाळा निश्चित झाल्या नाही. तर ओजससाठी विभागातून १८ पैकी केवळ १३ शाळा निवडण्यात आल्या. यामध्ये नागपूर जि.प.च्या काटोल कल्याण शाळा व हिंगणा तालुक्यातील नीलडोह उच्च प्राथमिक शाळेचा समावेश आहे. सहा विभागात १० तेजस शाळांची निर्मिती मार्गदर्शक म्हणून तर त्या शाळा ओजस निवडप्राप्त ९० शाळांना धडे देणार होत्या़ प्रस्ताव सादर झाल्यानंतर तत्काळ मुख्याध्यापक, शिक्षकांचे प्रशिक्षण पुणे यशदा येथे घेण्यात आले़ महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडे या सर्व प्रकल्पाचे नियंत्रण होते़ पायाभूत सुविधा, डिजिटलायझेशन, इमारतीपासून ते वाहत्ुाकीपर्यंत सर्व सुविधा या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार होत्या़ वर्षभराच्या काळातच या प्रकल्पावर काहीच अभिप्राय शासनाचा नसल्याने प्रकल्प जमा झाल्यागत आहे़ याबाबत नागपूर शिक्षण विभागाने स्मरणपत्र पाठवून प्रकल्पाविषयीचे पुढील निर्देश मागितले होते़ परंतु, या पत्रावर काहीही उत्तर आले नाही. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी हा प्रकल्प राबविला होता. त्यांची राजशिष्टाचार खात्यात बदली झाल्याने त्यांच्या जागी वित्त विभागातून वंदना कृष्णा या रुजू झाल्यात़ त्यामुळे हा प्रकल्प अडगळीत सापडल्याची माहिती आहे़तेजसची निवड अजूनही नाहीशासन निर्णयानुसार तेजस आणि ओजस प्रकल्पासाठी शाळांची निवड नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ दरम्यान करायची होती. शाळा व शिक्षक निवड जानेवारी २०१८ पर्यंत करायची होती. फेब्रुवारी २०१८ पासून प्रत्यक्षात प्रकल्प सुरू होणार होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओजससाठी विभागातून १३ शाळांची निवड झाली. शिक्षकांचे प्रशिक्षणही झाले. मुळात तेजस प्रकल्पात निवडलेल्या शाळा या ओजस प्रकल्पातील शाळांना सहकार्य व मार्गदर्शन करणार होत्या. परंतु तेजससाठी शाळांची निश्चिती झाली पण निवड अजूनही झाली नाही.

 

टॅग्स :SchoolशाळाInternationalआंतरराष्ट्रीय