शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय विधी विद्यापीठाला जागा कधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 02:46 IST

नागपुरातील राष्ट्रीय विधी विद्यापीठ कधी सुरू करणार व विद्यापीठाला जागा कधी देणार, यावर एक आठवड्यात उत्तर ....

हायकोर्टाची विचारणा : शासनाला मागितले उत्तरनागपूर : नागपुरातील राष्ट्रीय विधी विद्यापीठ कधी सुरू करणार व विद्यापीठाला जागा कधी देणार, यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य शासनाला दिले.यासंदर्भात हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरने अध्यक्ष अ‍ॅड. अरुण पाटील यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यानंतर न्यायालयाने राज्य शासनाचे मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, महसूल विभागाचे प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच याचिकेत राष्ट्रीय विधी विद्यापीठाला प्रतिवादी करण्याची अनुमती दिली. विद्यापीठाचे कुलपती म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर, डॉ.भवानी प्रसाद पांडा यांच्याकडे प्रभारी कुलगुरू म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. पांडा सध्या मुंबई येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. या दोन महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या असल्या तरी विद्यापीठ कधीपासून सुरू होणार, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. शासनाने आयआयएम, आयआयआयटी व एम्स यांना जागा दिली आहे. परंतु राष्ट्रीय विधी विद्यापीठाबाबत शासन फारसे गंभीर नाही. विद्यापीठासाठी अद्यापही जागा निश्चित झाली नाही. मिहानमध्ये भरपूर जागा उपलब्ध आहे. ही जागा विद्यापीठाला द्यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठ आगामी सत्रापासून सुरू करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी एक पर्यायही सुचविला आहे. सिव्हिल लाईन्स येथील ज्युडिशियल आॅफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची (जोती) इमारत सध्या उपयोगात नाही. या ठिकाणी आवश्यक सुविधा विकसित करून विद्यापीठ सुरू केले जाऊ शकते, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याकरिता शासनाने आवश्यक निधी तत्काळ मंजूर करावा आणि विद्यापीठाचे संचालन विधी व न्याय विभागाकडे सोपविण्यात यावे, अशी विनंतीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)