शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

नागपूर जिल्हा परिषद शाळांमध्ये  'व्हर्च्युअल क्लासरूम' कधी साकारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 8:01 PM

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची नाळ डिजिटलशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत व्हॅर्च्युअल क्लासरूमची संकल्पना राबविण्यात येणार होती. त्यासाठी नागपूर जि.प.च्या १५४ शाळांची निवडही करण्यात आली होती. मात्र पुढे या संकल्पनेचे काय झाले, हे समजण्यापलीकडचे झाले आहे.

ठळक मुद्दे१५४ शाळांची केली होती निवड

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची नाळ डिजिटलशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत व्हॅर्च्युअल क्लासरूमची संकल्पना राबविण्यात येणार होती. त्यासाठी नागपूर जि.प.च्या १५४ शाळांची निवडही करण्यात आली होती. मात्र पुढे या संकल्पनेचे काय झाले, हे समजण्यापलीकडचे झाले आहे.दिवसेंदिवस नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या ही घसरत चालली आहे. शासनाकडून विद्यार्थी पटसंख्या टिकविण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात जि.प.च्या सुमारे १५३८ वर शाळा आहेत. यापैकी तब्बल ३८० वर शाळातील विद्यार्थी पटसंख्या ही २० च्या आत आहे. विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये टिकून राहावा यासाठी शासनाकडून मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, माध्यान्ह भोजन आदीसारख्या योजना राबविण्यात येतात. याशिवाय विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी शाळांचे डिजिटलायझेशनही सुरू आहे.डिजिटलायझेशन करतानाच ‘व्हॅर्च्युअल क्लासरूम’ हा आणखी विकसित करणारा उपक्रम राबविण्यात येणार होता. यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या १३ तालुक्यातून जवळपास १५४ शाळांची निवडही करण्यात आली.राज्याच्या शिक्षण विभागाने जि.प. शाळांची पटसंख्या, वीजपुरवठा व वर्गखोल्यांची योग्यरीत्या तपासणी करून, त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडून शाळांचा अहवाल सादर झाल्यानंतर तो शासनाकडे पाठविण्यातही आला. आज सात महिने लोटूनही या संकल्पनेवर पुढे काय झाले, याचा काहीच ठावठिकाणा नाही. काय आहे व्हर्च्युअल क्लासरूमठाणे महानगरपालिकेतर्फे राज्यात प्रथमच मनपा शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविण्यात आल्याची माहिती आहे. या क्लासरूमच्या माध्यमातून विविध विषयांमधील नामांकित तज्ज्ञ शिक्षक या स्टुडिओंच्या माध्यमातून जि.प.च्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार होते. १६ शाळांचीच निवडसूत्रांच्या माहितीनुसार जि.प. शिक्षण विभागाने पाठविलेल्या १५४ शाळांपैकी राज्य शासनाने केवळ १६ शाळांची निवड ‘व्हर्च्युअल’ क्लासरूमसाठी निवड केली आहे. या शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल’ क्लासरूमचे साहित्यही पाठविण्यात आले आहे. परंतु याबाबत जि.प. शिक्षण विभागाला कुठलीच माहिती देण्यात आली नाही.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाnagpurनागपूर