नागपूर जिल्हा परिषद शाळांमध्ये  'व्हर्च्युअल क्लासरूम' कधी साकारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 08:01 PM2020-02-26T20:01:34+5:302020-02-26T20:02:36+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची नाळ डिजिटलशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत व्हॅर्च्युअल क्लासरूमची संकल्पना राबविण्यात येणार होती. त्यासाठी नागपूर जि.प.च्या १५४ शाळांची निवडही करण्यात आली होती. मात्र पुढे या संकल्पनेचे काय झाले, हे समजण्यापलीकडचे झाले आहे.

When will the Nagpur Zilla Parishad schools design a virtual classroom ? | नागपूर जिल्हा परिषद शाळांमध्ये  'व्हर्च्युअल क्लासरूम' कधी साकारणार?

नागपूर जिल्हा परिषद शाळांमध्ये  'व्हर्च्युअल क्लासरूम' कधी साकारणार?

Next
ठळक मुद्दे१५४ शाळांची केली होती निवड

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची नाळ डिजिटलशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत व्हॅर्च्युअल क्लासरूमची संकल्पना राबविण्यात येणार होती. त्यासाठी नागपूर जि.प.च्या १५४ शाळांची निवडही करण्यात आली होती. मात्र पुढे या संकल्पनेचे काय झाले, हे समजण्यापलीकडचे झाले आहे.
दिवसेंदिवस नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या ही घसरत चालली आहे. शासनाकडून विद्यार्थी पटसंख्या टिकविण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात जि.प.च्या सुमारे १५३८ वर शाळा आहेत. यापैकी तब्बल ३८० वर शाळातील विद्यार्थी पटसंख्या ही २० च्या आत आहे. विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये टिकून राहावा यासाठी शासनाकडून मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, माध्यान्ह भोजन आदीसारख्या योजना राबविण्यात येतात. याशिवाय विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी शाळांचे डिजिटलायझेशनही सुरू आहे.
डिजिटलायझेशन करतानाच ‘व्हॅर्च्युअल क्लासरूम’ हा आणखी विकसित करणारा उपक्रम राबविण्यात येणार होता. यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या १३ तालुक्यातून जवळपास १५४ शाळांची निवडही करण्यात आली.
राज्याच्या शिक्षण विभागाने जि.प. शाळांची पटसंख्या, वीजपुरवठा व वर्गखोल्यांची योग्यरीत्या तपासणी करून, त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडून शाळांचा अहवाल सादर झाल्यानंतर तो शासनाकडे पाठविण्यातही आला. आज सात महिने लोटूनही या संकल्पनेवर पुढे काय झाले, याचा काहीच ठावठिकाणा नाही.
 काय आहे व्हर्च्युअल क्लासरूम
ठाणे महानगरपालिकेतर्फे राज्यात प्रथमच मनपा शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविण्यात आल्याची माहिती आहे. या क्लासरूमच्या माध्यमातून विविध विषयांमधील नामांकित तज्ज्ञ शिक्षक या स्टुडिओंच्या माध्यमातून जि.प.च्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार होते.
 १६ शाळांचीच निवड
सूत्रांच्या माहितीनुसार जि.प. शिक्षण विभागाने पाठविलेल्या १५४ शाळांपैकी राज्य शासनाने केवळ १६ शाळांची निवड ‘व्हर्च्युअल’ क्लासरूमसाठी निवड केली आहे. या शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल’ क्लासरूमचे साहित्यही पाठविण्यात आले आहे. परंतु याबाबत जि.प. शिक्षण विभागाला कुठलीच माहिती देण्यात आली नाही.

Web Title: When will the Nagpur Zilla Parishad schools design a virtual classroom ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.