दोषीला अटक कधी होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:29+5:302021-04-16T04:08:29+5:30
जलालखेडा: नरखेड तालुक्यातील खलानगोंदी येथे रविवारी दोन महिलांचा शेतातील विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झाला होता. कलाबाई ज्ञानेश्वर कुमरे (४८) व ...

दोषीला अटक कधी होणार ?
जलालखेडा: नरखेड तालुक्यातील खलानगोंदी येथे रविवारी दोन महिलांचा शेतातील विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झाला होता. कलाबाई ज्ञानेश्वर कुमरे (४८) व सुशीला सुरेश दहिवाडे (४९) अशी मृत महिलांची नावे आहेत. अंबाडा येथील शेतकरी नानाजी बेले यांच्या शेतात मजुरीला गेल्या असताना तारेच्या कुंपणाला लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे या दोन महिलांचा जीव गेला होता. या प्रकरणी नानाजी बेले यांचा मुलगा चंद्रशेखर बेले याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सोमवारी नरखेड न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने चंद्रशेखर याला तीन दिवसाचा पीसीआर दिला आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी नानाजी बेले घटनेच्या दिवसापासून फरार आहे. दोन दिवस उलटूनही तो पोलिसांच्या हाती लागला नाही. घटनेच्या दिवशी नागरिकांनी मुख्य आरोपीला अटक करा नंतरच मृतदेह उचलू अशी भूमिका घेतली होती. परंतु पोलिसांनी व राजकीय मंडळींनी त्यांची समजूत काढून व आरोपीला लवकर अटक करू, असे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही नानाजी बेले यांना अटक झालेली नाही.